loader image

बघा व्हिडिओ : साईराज परदेशी ची विक्रमी कामगिरी दोन सुवर्ण व एक कांस्यपदक

Nov 19, 2023


छत्रपती संभाजी नगर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय युथ जूनियर व सीनियर गटाच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळा व छत्रे विद्यालयाच्या व सध्या भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे सराव करणारा साईराज राजेश परदेशी याने चुरशीच्या लढतीत ८१ किलो वजनी गटात राज्यस्तरीय युथ व ज्युनियर स्पर्धेत १२८ किलो स्नॅच व १५५ किलो क्लीन जर्क असे २८३ किलो वजन उचलून युथ व ज्युनियर दोन्ही वयोगटात दोन सुवर्ण व सीनियर्स मध्ये कांस्यपदक पटकावले तसेच जयराज राजेश परदेशी याने ८९ किलो वजनी गटात जूनियर मध्ये ११५ किलो स्नॅच व १४५ किलो क्लीन जर्क असे एकूण २६० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले
साईराज व जयराज दोन्ही सख्या भावंडांनी राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी साईराज व जयराज चे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.