नांदगांव : मारुती जगधने सुमारे १५ हजार लोकवस्ती असलेल्या साकोरा गावची एक वर्षापूर्वी मंजूर झालेली पाणी योजना ठेकेदाराने ठेंगा दाखविल्याने रखडली ?
साकोरा पाणी योजनेचे कामं पूर्ण न झाल्याने साकोरा गावाला पाणी टंचाई निर्माण झाली आहे .चार कोटी ९२ लाइटची पाणी योजना मंजुर झाली पण योजनेचे काम एक वर्षात पूर्ण झाले नाही योजना ठेकेदारामुळे रखडल्याचा आरोप करीत साकोरा ग्रामस्तानी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गत एक वर्षापासून शासनाच्या जलजीवन मिशन योजनेंतर्गत गिरणाडॅम ते साकोरा नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली .मात्र संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे योजना अपूर्ण आवस्थेत आहे .यामुळे
साकोरा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून या सप्ताहात योजनेचे काम सुरू न झाल्यास नांदगाव तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे एका निवेदनाद्वारे साकोरा नागरिकांनी मागणी केली आहे.
सन २०२२ मध्ये साकोरा गावांसाठी गिरणाडॅम ते साकोरा एकुण ४ कोटी ९२ लाखांच्या नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती.
यावर्षी साकोरा परिसरात पाऊस न झाल्याने विहीरी आणि बोअरवेल कोरड्याठाक पडल्याने गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे.आजच पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे.यापुढील अजून आठ महिने कसे जातील याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.सदर योजना पुर्ण करुन २३ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतकडे वर्ग करावयाचे आदेश होते.मात्र संबंधित ठेकेदाराने पाच महिन्यांपासून हे काम बंद केल्याने तसेच सदर काम अंदाजपत्रकानुसार न झाल्याने अनेक ठिकाणी पाईप चोरी गेले असल्याचे निवेदनात म्हटले आहे.संबधीत ठेकेदाराला याबाबत ग्रामपंचायत तर्फे अनेक वेळा बोलवण्यात आले होते.
मात्र उडवाउडवीची उत्तरे देवून पाणी उद्वभवापासून एक्स्प्रेस फिडर लाईटसाठी आर्थिक तरतूद नसल्याचे सांगत योजनेचे काम रखडल्याने गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे.सदर योजनेची प्रशासनाने गंभीर दखल घेवून येत्या सहा दिवसांत काम सुरू करण्यात यावे अन्यथा २४ नोव्हेंबर
पासून तहसिल कार्यालय नांदगाव येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल असा स्पष्ट इशारा निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.सदर निवेदनावर माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश बोरसे,शरद सोनवणे,कृ.उ.बा.संचालक सतिष बोरसे,ग्रा.प.सदस्य घनश्याम सुरसे,किरण बोरसे, सुरेश बोरसे,मधुकर सुर्यवंशी, प्रशांत बोरसे, अमरनाथ सुरसे,राजेंद्र बोरसे, संदिप बोरसे,गणेश सुरसे,विनोद कदम,पांडुरंग बोरसे,स्वप्निल बोरसे,पारस बोरसे, देवदत्त सोनवणे,रूषिकेश बोरसे,प्रितम बोरसे,हेमंत बोरसे आदि पन्नास नागरीकांच्या स्वाक्षरी आहेत.

राशी भविष्य : २९ऑगस्ट २०२५ – शुक्रवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....