loader image
[ays_poll id=7]

नांदगाव नॅशनल हायवेवरील अनधिकृत गतीरोधकामुळे होताहेत अनेक प्रवासी जखमी – गतिरोधक काढण्याची मागणी

Nov 23, 2023


नांदगाव : (मारुती जगधने)
शासन डिझेल पेट्रोल बचतीचे मार्ग शोधत आहे त्यातच नॅशनल हायवे किंवा राज्यमार्गावरील व अन्य मार्गावरील गतिरोधक सरसगट काढण्याचे आदेश असताना नांदगाव शहरातील नांदगाव मनमाड रोडवर कोणतेही कारण नसताना अनाधिकृत गतिरोधक टाकुन सार्वजनिक बांधकाम विभागाने न्यायालयाच्या आदेशाला व नॅशनल हायवेच्या नियमांना धाब्यावर बसवले आहे.
या अनधिकृत गतीरोधकाने जुन्यापंचायात समितीजवळील रोडवर अनेक जण पडून जखमी झाले. अनेकांच्या चार चाकी वाहनांचे पाटे निखळले तर अनेनकांना मनक्याचा ञास उध्दभवला आहे. असे हे गतिरोधक काढण्याची मागणी होत आहे .
नांदगांव मनमाड नॅशनल हायवे वरील नांदगाव शहरा लगत कोल्ह्या नाला पुलावर अनाधिकृतपणे तिन गतीरोधक बसवल्याने या गतीरोधकाच्या धक्याने आनेक दुचाकीस्वार गंभीर जखमी होत आहे मागील महिण्यात गतिरोधक बनविले त्याच दिवसी दोन अपघात झाले त्यात गरोदर महिला व तिचे बाळ हे दुचाकीवरुन पडून जखमी झाले त्या नंतर दिवाळी सणाच्या चार दिवस लागोपाठ दुचाकीवरुन रोज दोन तिन महिला गतिरोधकाच्या धक्याने पडून जखमी झाल्या त्यांची दिवळी दवाखाण्यात झाली त्यात आनेक महिलांच्या पायाला व पाठीला कमरेला मार लागुन जखमी झाल्या त्यांनी खाजगी रुगानलायात उपचार घेतले .या गरीरोधकाने आनेकांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या हे गतिरोधक काढून टाकण्याची मागणी नागरीक व वाहनधारकांनी केली या गतीरोधकावरुन रोज दोनतीन प्रवासी दुचाकीवरुन पडून जखमी होतात या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन बेकायदेशीर बनविलेले गतिरोधक काढून टाकावे अन्यथा आम्ही ते गतिरोधक खोदुन काढू अशा प्रतिक्रिया जखमींनी व्यक्त केल्या.
तसेच शहरातील नॅशनल हायवेवरील फुटपाथ देखील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले असून पादचार्यांना गतीरोधकावरुन ठोकरा खात चालावे लागते आनेक ठिकाणी पादचारी मार्गावरील गटारीचे ढापे अद्याप उघडे आणी अर्धवट अवस्थेत आहे .त्या उघड्या ढाप्यातुन दर्गंधी पसरत असून त्यात डासांनी उच्छाद मांडला आहे. पादचारी मार्गावरील गटारींना ढापे टाकून दुरूस्ती करुन मार्ग मोकळा करावा अशी मागणी देखील होत आहे .


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.