नांदगाव : मारुती जगधने
लग्नाचे वय झाले नसताना सुद्धा अल्पवयीन मुलींचे लग्न लाऊन दिले त्यांना मुले झाली अशा माता पिता व सासू सासरे यांच्या विरूद्ध पास्को अंतर्गत गुन्हा दाखल नांदुर ,पळाशी,चिंचविहिर येथील माता पिता व सासु सासरे संशयाच्या पिंजऱ्यात शिवाय पतिविरुद्द बलात्काराचा गुन्हा दाखल झाला .
नांदगाव पोलीस स्टेशन येथे 2 अल्पवयीन मुलींच्या तक्रारी वरून आई वडील, सासू सासरे व पती यांचे वर गुन्हे दाखल
सदरील पीडित फिर्यादी ह्या अल्पवयीन असल्याचे पीडितेचे आई वडील, सासू सासरे व पती यांना माहीत असतानाही सदरील पीडित हिचे अल्पवयात लग्न लावून दिल्याने सदरील पीडित ह्या तिचे पतीपासून गर्भवती राहिल्याने त्यांना डिलिव्हरी साठी ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे ऍडमिट केले असता सदरील पीडित ह्या अल्पवयात बाळंतीण झाल्याने त्यांची mlc नांदगाव पोलीस स्टेशन ला कळविल्यावरून सदरील पीडितेचे जबाब घेऊन पीडितेचे आई वडील, सासू सासरे व पती यांचे विरुद्ध भादवी कलम 376(2)(n) सह पोस्को कलम4,6,8,10,17 सह बाल विवाह प्रतिबंध कायदा कलम 9,10,11 प्रमाणे 02 गुन्हे दाखल केले असून तपास psi वाघमारे psi बहाकर हे पोनी श्री चौधरी सो यांचे मार्गदर्शनाने करीत आहेत.

साईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची भारतीय संघात निवड
आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज परदेशी याची सलग सहव्या वेळेस भारतीय संघात निवड करण्यात आली असून...