loader image

कृष्णा व्यवहारे व मेघा आहेर यांनी पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान

Nov 26, 2023


दोन सुवर्ण चार रौप्य व सात कांस्य पदकासह राज्यस्तरीय यूथ जूनियर सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंनी पटकावले युथ मुलींचे सांघिक उपविजेतेपद
छत्रपति संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या युथ जुनियर व सीनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत जयभवानी व्यायामशाळेच्या कृष्णा व्यवहारे याने युथ मुलांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करीत स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान पटकावला
मेघा संतोष आहेर हिने ४५ किलो युथ मध्ये ६४ किलो स्नॅच ७८ किलो क्लीन जर्क असे १४२ किलो वजन उचलून युथ मध्ये सुवर्ण व जूनियर मध्ये कांस्यपदक तसेच युथ मुलींमध्ये पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान
पूजा राजेश परदेशी हिने ६४ किलो सिनियर्स मध्ये ७८ किलो स्नॅच व १०० किलो क्लीन जर्क असे १७८ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले
आकांक्षा किशोर व्यवहारे हिने ४५ युथ मध्ये रौप्य आनंदी सांगळे हिने ७१ किलो यूथ मध्ये रौप्य ७१ किलो ज्युनियर्स मध्ये वैष्णवी उगले हिने एक रौप्य व सीनियर्स मध्ये कांस्यपदक विनाताई आहेर हिने ४५ किलो सीनियर्स कांस्यपदक व पूजा वैष्णव हिने ५५ किलो ज्युनियर्स मध्ये कांस्यपदक ६४ किलो ज्युनियर्स मध्ये वैष्णवी उगले हिने कांस्यपदक व धनश्री विनोद बेदाडे हिने ८१ किलो ज्युनियर्स व सीनियर्स मध्ये दोन कांस्यपदके पटकावली दिया व्यवहारे खुशाली गांगुर्डे करुणा गाढे श्रावणी पुरंदरे वैष्णवी शुक्ला यांनी स्पर्धेत नाशिक जिल्हयाच प्रतिनिधित्व करीत चांगली कामगिरी बजावली
पूजा परदेशी आकांक्षा व्यवहारे वैष्णवी उगले वैष्णवी ईप्पर पूजा वैष्णव विनाताई आहेर हे सर्व खेळाडू भारतीय क्रीडा प्राधिकरण औरंगाबाद येथे प्रशिक्षण घेत आहेत
यशस्वी खेळाडूना छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
छत्र विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील प्राचार्य डॉ दत्ता शिंपी महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

 

 

 


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
.