loader image
[ays_poll id=7]

जिल्ह्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे ना. भारती पवार यांनी दिले निर्देश

Nov 27, 2023


दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात दिंडोरी, निफाड, मनमाड, नांदगांव , चांदवड व येवला तालुक्यामध्ये वादळी वा-यासह पाऊस व गारपीट झाल्याने तात्काळ वस्तुनिष्ठ पंचनामे करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री ना. भारती पवार यांनी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निर्देश दिले आहेत.
जिल्ह्यातील प्रामुख्याने द्राक्षबागा, फळबागा तसेच टमाटे, कांदारोपे, गहू, हरबरा, ऊस, भातपिक, भाजीपाला इत्यादी पिके अवकाळी पावसामुळे व गारपीटमुळे भूईसपाट होऊन पावसात भिजल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी या आसमानी संकटात धीर धरावा व घाबरून जाऊ नये नुकसान ग्रस्तांना शासन स्तरावरून या नैसर्गिक आपत्तीने झालेली नुकसान भरपाई मिळवून देण्यात येईल तसेच नुकसानग्रस्त विमाधारक शेतक-यांना विमा कंपन्यांकडुन तात्काळ पिकविमा मिळणेबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे ना. भारती पवार यांनी मागणी केली आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे आयोजित संघटन पर्व 2024-25 अंतर्गत भाजपा सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भाजपा च्या संघटन पर्व 24-25 अंतर्गत मनमाड शहर भाजपा...

read more
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य...

read more
.