loader image

गुरुनानक जयंती निमित्त आमदार कांदे यांनी दिली गुरुद्वारा येथे भेट

Nov 27, 2023


आमदार सुहास आण्णा कांदे व शिवसेना पदाधिकारी यांनी आज मनमाड गुरुद्वारा येथे भेट दिली.
गुरू नानक देव जयंती निमित्त गुरुद्वारात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित समाज बांधवांना जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.
या वेळी गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंह जी यांचा सत्कार आमदार सुहास आण्णा कांदे यांनी केला.
या प्रसंगी बोलतांना गुरुद्वारा च्या माध्यमातून मोठे समाजकार्य होत असते, प्रत्येक सामाजिक अडचणीत गुरुद्वारा तर्फे उत्तम कार्य केले जाते, आणि याच साठी भविष्यात गुरुद्वराच्या विस्तारासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सोबतच गुरुद्वाराच्या माध्यमातून होत असलेल्या सामाजिक व धार्मिक उपक्रमांसाठी पाच लाख रुपये देणगी यावेळी बाबजींकडे सुपूर्द केली.
या वेळी युवासेना जिल्हाप्रमुख फरहान दादा खान, अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, शहर प्रमुख मयूर बोरसे, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले,आसिफ शेख,माजी नगराध्यक्ष बबलू पाटील,पिंटू शिरसाठ,राकेश ललवाणी, एजाज शाह,आप्पा आंधळे,अमिन पटेल,आजू शेख, दिनेश घुगे,निलेश ताठे, पिंटू वाघ,महिंद्र गरुड,अतुल भडारी,अमोल दांडगव्हल,अजिंक्य साळी,प्रमोद अहिरे,स्वराज वाघ,सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

मनमाड क्रिकेट असोसिएशन तर्फे कार्यसम्राट आमदार मा.सुहासआण्णा कांदे साहेब यांचा सत्कार.

  मनमाड:-आपल्या नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय,कार्यसम्राट, पाणीदार, क्रीडासम्राट दमदार आमदार...

read more
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष दत्तू पवार यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

  नांदगाव - आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत देवाज बंगलो नांदगाव येथे राष्ट्रवादी...

read more
नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव तालुक्यात दोन अद्ययावत रुग्णवाहिकांचे आमदार कांदे यांच्या हस्ते लोकार्पण

नांदगाव आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या प्रयत्नातून व हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या...

read more
.