नांदगाव सोमनाथ घोगांणे
अतिवृष्टी आणी गारपीट वाऱ्यासह अवकाळी पाऊस मुळे संपूर्ण राज्यात शेतपिकाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे द्राक्षबाग, फळबाग, टमाटे कांदारोप सह हरबरा गहु ऊस भातपिकाचे व भाजीपाला आणी सर्व इतर पिकाचे पावसात भिजल्याने शेतकर्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तसेच पशुधनाची हानी सोबतच काही भागात जीवितहानी देखील झाली आहे लोकांच्या घराचे सुद्धा खूप नुकसान झाले आहे तरी ही आपण शासन स्तरावर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून सर्व अवहाल बोलावून घेऊन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देऊन नांदगाव, मनमाड, चांदवड, येवला नाशिक जिल्ह्य सहित संपूर्ण राज्यात शासकीय मदत जाहीर करा अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा सागर फाटे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्राद्वारे केली आहे तसेच त्यांनी कृषी मंत्री पालकमंत्री कृषी आयुक्त जिल्हाधिकारी तहसीलदार यांच्या सोबत संपर्क साधून त्यांना पण विनंती केली आहे की आपण विशेष लक्ष देऊन तातडीने शासकीय मदत जाहीर करा.