loader image
[ays_poll id=7]

बघा व्हिडिओ-नांदगाव येथे ७८ गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या ५ व्यक्तीवर गुन्हा दाखल

Nov 30, 2023


नांदगांव : मारुती जगधने
विनापरवाना, अमानुषपणे पाळीव प्राण्यांची वाहतूक करुन त्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या पाच दोषीवर गुन्हादाखल करुन त्यांच्या जवळून ७८ पाळीव गोवंश जनावरे तिन मालट्रक जप्त करण्यात आले आहे.

नांदगाव पोलिसानी संशयीतरित्या वाहतूक करणाऱ्या मालवाहु ट्रक चालकाना हटकले असता त्या वाहनामध्ये जर्शि गायी व वासरे मिळून आल्याने या प्रकरणी चालक व क्लिनर अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करुन त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे .
सदर गोवंश जातीची गुरे बेकायदेशीर रित्या ताब्यात बाळगून त्यांची वाहनामध्ये अवैधरित्या बेकायदेशीरपणे अपुऱ्या जागेत कोंबून त्यांची मान तोंड दोरीने बांधून वैद्यकिय अधिकार्याच्या प्रमाण पञाशिवाय वाहतूक करीत असताना त्यातील दोन जनावरे मयत झाली .अशा वाहनचालकावर नांदगांव पोलिसात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.
दरम्यान
३ आयशीयर मालवाहु ट्रकमध्ये वाहतूक करताना एकुन ७८ वासरे ( जर्शि गायी) पकडण्यात आल्या त्यात दोन गायी(वासरे ) चेंगराचेंगरीत ठार झाल्या या घटनेची सर्वञ चर्चा उमटली घटनेचा नांदगांव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला .
ज्या वाहनातून जनावारांची बेकायदेशीर निर्दयीपणे वाहतूक केली गेली ती वाहने ट्रक नंबर एम एच१८/बी झेड ९९९८,एम एच १८/बी जि २८७३,एम एच १८/बी जी ३९७६ या एैशियर तिन ट्रक असून या
मध्ये कोंबून भरलेली जनावरे या मधील दोन गायीची वासरे चेंगराचेंगरीत मयत झाली .सदर जर्शीगायीं व वासरे वाहतूक करून त्यांची विक्री करत होते .विशेष म्हणजे या अर्थ गायी वासरांच्या कानाला पिवळा टॅग मारलेला आहे म्हणजे हि जनावरे शासनाच्या नोंदणीत आहेत असा अंदाज निघतो. सदर जनावरांची वाहतूक करून त्याचा व्यापार कशासाठी केला जातो हे
तपासा अंती कळेल. या बाबत पो नि प्रितम चौधरी,स पो नि खंडागळे ,पो उ नि मनोज वाघमारे व सहकारी तपास घेत आहे .


अजून बातम्या वाचा..

मनमाड  येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी...

read more
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय येथील वाणिज्य विभागाचे कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथे अभ्यास भेट.

मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांची औद्योगिक-शैक्षणिक भेट...

read more
मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न.    – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड साहित्य संघाच्या काव्य स्पर्धा उत्साहात संपन्न. – सेंट झेवियर्स हायस्कूलच्या कु. श्रद्धा शिंदे हिस प्रथम पुरस्कार.

मनमाड (प्रतिनिधी)- मनमाड साहित्य संघा ने आयोजित केलेल्या शालेय विद्यार्थ्यांसाठींची काव्यस्पर्धा...

read more
.