loader image

गारपीट ग्रस्त भागाची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पाहणी…*

Nov 30, 2023


मनमाड सह नांदगाव तालुक्यातील अचानक गारपीठी पावसामुळे नुकसान झालेल्या मनमाड जवळील नगरचौकी शिवार, कॅम्प परिसर, ट्रेनिंग कॉलेज, अनुकवाडे शिवार येथील नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शेती प्रत्यक्षात पाहणी करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने त्यांचे सांत्वन करण्यात आले. जमीनदोस्त झालेल्या पीक दाखवत शेतकरी बांधवांनी टाहो फोडीत आपल्या पाणावलेल्या डोळ्यांनी मनातील वेदना सांगितल्या. या संदर्भात तहसीलदार श्री. सिध्दार्थ मोरे यांच्याशी प्रत्यक्षात चर्चा करून ग्रामसेवक,तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या समवेत महसूल विभागातील अधिकारी,कर्मचारी यांनाही प्रत्यक्षात आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे. जेणेकरून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन शेतकरी बांधवांना दिलासा मिळेल ,शिवाय कुठल्याही शेतकरी बांधवांवर अन्याय न होता पारदर्शक पंचनामे होऊन प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाला न्याय मिळेल.
शासनाने तातडीने नुकसान भरपाई लवकर द्यावी , यासाठी आपण स्वतः तत्परतेने पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी हावलदील झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना ग्वाही दिली. या अनुषंगाने गारपिटीमुळे शेतामधील उभे असलेले विद्युत खांब कोसळल्याने त्याचबरोबर डीपी मध्ये नुकसान झाल्याने अनेक शेतातील वीज पुरवठा खंडित झालेला आहे एम एस ई बी च्या कर्मचाऱ्यांनी तातडीने युद्धपातळीवर हे काम सुरू करून विद्युत पुरवठा पूर्ववत करावा म्हणून एम एस ई बी चे अधिकारी अभियंता यांच्याशी यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी गणेश धात्रक यांच्या समवेत प्रशासनाचे तलाठी जोपूळे साहेब, शिवसेना नांदगाव विधानसभा संपर्क प्रमुख शिर्के सर, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद,शहर प्रमुख माधव शेलार, सामाजिक कार्यकर्ते पिंटू मामा कटारे, प्रकाश बोधक, राजू मामा सांगळे,राहुल सांगळे, अम्राळे आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

नांदगाव तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

मनमाड:-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक, व...

read more
.