loader image

नांदगाव येवला रोडवर मल्हारवाडी येथे अपघातात महिला जागीच ठार

Dec 1, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगाव येवला रोडवर मल्हारवाडी गावाजवळ शुक्रवारी सकाळी कंटेनरच्या टायरखाली सापडून सुनीता माणिक जाधव ( वय अंदाजे ४५) रा. धनेर ही महिला जागीच ठार झाली . तर दुचाकी स्वार जखमी झाला. अपघाताची माहीती मिळताच पोलिस निरीक्षक प्रितम चौधरी सहाय्यक पो. नि. नितीन खंडागळे तत्काळ अपघात स्थळी येवून जखमी व्यक्तीस ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असून मृतदेह रूग्णालयात नेण्यात आला व वाहतूक सुरळीत केली.
सदर महिलेचे माहेर शहरातील मल्हारवाडी येथील चव्हाण परिवारातील असून ती आपला भाऊ सोमनाथ चव्हाण याचेकडे माहेरी आलेली होती. सकाळच्या सुमारास ती आपल्या पतीच्या स्कुटर वर बसून धनेर येथे जात असतानां मल्हारवाडी येथे स्कूटरला दुसऱ्या मोटारसायकल ने हुलकावणी दिल्याने सदर महिला स्कुटर वरून खाली पडल्याने कंटेनर खाली येवून जागीच ठार झाली.

इंदोर पुणे राज्यमहामार्गावरील मनमाड शहरातील रेल्वे लाईन वरील उड्डान पुलाचा कठडा तुटल्याने सदर वाहतूक मालेगाव नांदगाव येवला या मार्गाने वळविली असून नांदगाव शहरातील जुनी पंचायत समिती ते रेल्वे बायपास मार्गे मल्हारवाडी पर्यत मोठया प्रमाणावर वाहतूक वाढली असून सदर वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.


अजून बातम्या वाचा..

.