loader image

नांदगाव येथे वाढलेल्या रहदारीच्या उपाययोजनांबाबत आ. कांदे यांच्या सुचना

Dec 2, 2023


नांदगाव : मारुती जगधने
आमदार सुहास कांदे यांच्या सूचने वरुन नांदगाव येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात नांदगाव शहरातील वाढलेली रहदारी व त्यावर उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक घेण्यात आली. या वेळी आमदार कांदे यांनी फोनवरून अधिकाऱ्यांना तत्काळ उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या. सर्व शासकीय अधिकारी ,शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी नायब तहसीलदार कोणकर , पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी , सार्वजनिक बांधकाम खात्याचे निकम तसेच राष्ट्रीय महामार्गाचे सुपरवायझर हर्षल चौधरी, नांदगाव नगरपालिकेचे निकम , नायब तहसील योगेश पाटील उपस्थित होते.
मनमाड येवला मार्गावरील वाहतूक बंद केल्यामुळे मालेगाव धुळे कडून येणाऱ्या सर्व गाड्या नांदगाव मार्गे येवला जात आहेत यामुळे नांदगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची रहदारी वाढली असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे, नुकताच झालेल्या अपघातात एका महिलेचे दुर्दैवी निधन झाले. या पार्श्वभूमीवर तातडीची बैठक बोलावून सर्व प्रशासकीय स्तरावर रहदारी नियंत्रणाच्या आदेश देण्यात आले.
यावेळी ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याच्या सूचना केलेले आहेत, पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासनाला त्वरित जास्त रहदारी असलेल्या ठिकाणी रहदारी नियंत्रित करण्यासाठी आपले कर्मचारी नेमण्याच्या सूचना करण्यात आल्या.
यावेळी पोलीस प्रशासन व नगरपालिकेत प्रशासनाने तात्काळ रहदारी नियंत्रणासाठी कर्मचारी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले तर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवणे व खड्डे रिपेअर करून देण्याचे सांगण्यात आले.
या बैठकीस विलास आहेर , विष्णू निकम , डॉ.सुनील तुसे, सुधीर देशमुख, अमोल नावंदर, सागर हिरे सुनील जाधव, रमेश काकळीज, पोपट सानप बापूसाहेब जाधव, भैय्या पगार समाधान पाटील, डॉ प्रभाकर पवार , शशी सोनवणे, राजेंद्र पवार, प्रकाश शिंदे, मुज्जू शेख, मयूर लोहडे, उपस्थित होते.
नांदगांव शहरात मालेगांव रोड पासून फुटपाथवर आसलेले अतिक्रमण ,नांदगांव शहर हुत्माचौक वळण ,गुप्तालाॅन्स,बसस्थानक मार्ग, गिरणा काॅलणी लगत,गंगाधरी हावेवर,गंगाधरी चौफुलीवर,आणी रेल्वे फाटक,एसटी कॉलनी लगत असलेले अतिक्रमणे पादचाऱ्यांना खुली करुन द्यावी अशी मागणी होत आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.