loader image

वाहतुकीवर अडथळा करणाऱ्या वाहनांवर दंडाची कारवाई

Dec 4, 2023


नांदगाव सोमनाथ घोगांणे


नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या पुणे-इंदौर महामार्गावरील रेल्वे ओवरब्रिजचा एक भाग कोसळल्याने या घटनेनंतर वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आला असून मालेगाव व येवल्याकडे जाणारी वाहतूक चांदवड, लासलगाव, विंचूर, येवला मार्गे वळविण्यात आली. मालेगाव कडून छत्रपती संभाजी नगर, येवला, अहमदनगर कडे जाण्यासाठी नांदगाव हा मार्ग असल्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. यामुळे नांदगाव शहरात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार सातत्याने वाढत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
नांदगाव-येवला रस्ता अरुंद असल्याने अवजड वाहनांची संख्या वाढल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.शहरातील स्टेट बँक,शनीमंदिर,या भागात वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहे. नांदगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कॉलेज, शाळेतील विद्यार्थी तसेच वृद्ध, सायकलवरून जाणारी मुलं यांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते.
वाहतुकीची कोंडी होत असल्याने याठिकाणी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली असून
पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस हवालदार भगवान सोनवणे, नेमणूक जिल्हा वाहतूक शाखा शिपाई अंकुश शिंदे,दीपक मुंडे,धर्मराज अलगट,पोलीस शिपाई साईनाथ आहेर,आदींनी
वाहतुकीवर अडथळा करणाऱ्या वाहनांवर प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला.ट्रिपल सीट मोटर सायकल,नो पार्किंग,अश्या वाहनांवर इ .चलन द्वारे कारवाई करण्यात आली. पोलीसांच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.