नांदगाव सोमनाथ घोगांणे
नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील अदिवासी महिला सरपंचाच्या उपोषणाचा आज सातवा दिवस.अजूनही प्रशासनाने कुठलीही कारवाई केली नाही. कारवाई बाबत प्रशासन दुर्लक्ष का करत आहे.अशी चर्चा शहरात जोर धरू लागली आहे.
नांदगाव तालुक्यातील मंगळणे येथील ग्रामसेविकेच्या विरोधात सरपंच वैशाली पवार यांनी नांदगाव पंचायत समितीच्या गेट जवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशीही कुठलाच तोडगा निघाला नाही.
यंत्रणेला या प्रकरणात जाग येत नाही का असा सवाल लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी प्रभारी गटविकास अधिकारी दळवी यांना विचारला आहे.
ज्या ग्रामसेविके विरोधात उपोषण सुरु आहे, त्यांच्याकडे मंगळणे येथील ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कारभार आहे.
मंगळणे येथील शरद विजय आहेर या १५ वर्षांच्या मुलाच्या नावे ग्रामसेविका गौरी आहेर यांनी
पाईपलाईन दुरुस्तीसाठी ४३०० रुपये कसे काढले. याची चौकशी करण्यात यावी. कॉन्ट्रॅक्टर सागर मोतीराम आहेर यांच्या नावे अर्धवट राहिलेल्या भुमीगत गटार कामाचे १ लाख २८ हजार ७८० रुपये काढण्यात आलेले आहे त्याची चौकशी करण्यात यावी. कॉन्ट्रॅक्टर सागर मोतीराम आहेर यांच्या नावे पाणीपुरवठा व विजपंप अर्धवट राहिलेल्या कामाचे १ लाख ८७ हजार ९९० रु. कसे काढले. ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक मुतारी हि सरपंच व सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर मुतारी पाडण्यात आली याची चौकशी करण्यात यावी. ग्रामसेविका गौरी आहेर ह्या मुख्यालयी राहत नाही त्यामुळे त्यांची चौकशी करण्यात यावी.
१५ वित्त आयोगाचे पैसे परस्पर खर्च करण्यात आले याची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणीचा फलक तहसील कार्यालयाच्या गेट जवळ लावण्यात आलेला आहे.
