loader image

मनमाड, नाशिक येथील प्रवाशांसाठी मुंबई – मनमाड स्पेशल ट्रेन सुरू करावी खासदार हेमंत गोडसे यांची केंद्रिय रेल्वे राज्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

Dec 6, 2023


नाशिक – रेल्वे प्रशासनाने नव्याने आखलेल्या रेल्वे गाड्यांच्या टाईमटेबलमुळे नाशिकसह मनमाडकरांवर मोठा अन्याय झालेला आहे. मनमाडपर्यंत असलेल्या दोन रेल्वेगाड्यांना प्रशासनाने धुळे आणि नांदेड पर्यत एक्सटेंशन दिल्याने मनमाडहून नाशिक आणि मुंबईकडे तसेच मुंबई आणि नाशिककडून मनमाडला जाणाऱ्या प्रवाशांसह चाकरमान्यांची मोठी कुचंबणा होत आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेत मनमाड – मुंबई या दोन शहरांना जोडणारी रोजच्या साठी म्हणूून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची आग्रही मागणी केली.

धुळे आणि नांदेड जिल्हावासियांच्या तगादया पुढे झुकून काही माहिन्यांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मनमाड साठी असणाऱ्या दोन्ही गाड्यांना पुढे एक्सटेंशन दिले आहे. यामुळे या रेल्वे गाड्यांवर आता धुळे आणि नांदेड येथील प्रवाशांचा मोठा हक्क झाला असून नाशिक आणि मनमाड येथील प्रवाशांवर अन्याय झाला आहे.नासिक येथून मनमाडला ये- जा करणाऱ्या चाकरमान्यांची संख्या रोज हजारोंच्या घरात आहे. रेल्वे प्रवाशांच्या वरील निर्णयामुळे चाकणनामे त्रस्त झाले आहे. नासिक आणि मनमाड येथील रेल्वे प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मुंबई ते मनमाड यादरम्यान रोज धावणारी स्पेशल रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी जिल्ह्यातील रेल्वे प्रशासनाकडून खासदार गोडसे यांच्याकडे होत आहे.

रेल्वे प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन आज खासदार हेमंत गोडसे यांनी दिल्लीत जात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. सीएसटी आणि लोकमान्य टिळक टर्मिनल येथून मनमाडला जाणाऱ्या दोन्ही गाड्यांना पुढे धुळे आणि नांदेड पर्यंत एक्सटेंशन दिल्याने नाशिक आणि मनमाड येथील रेल्वे प्रवाशांना रेल्वे गाडीत बसण्यास जागाच मिळत नाही. मनमाड पर्यंत जाणाऱ्या दोघा रेल्वे गाड्यांना धुळे आणि नांदेड पर्यंत एक्सटेन्शन दिल्याने नाशिक ते मनमाड रोज प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कुंचबना होत आहे. या परिस्थितीवर मात करून नाशिक, मनमाड येथील प्रवाशांना दिलासा देण्यासाठीमनमाड -मुंबई या दोन शहरांना जोडणारी रोजच्या साठी म्हणूून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची आग्रही मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केंद्रिय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.