मनमाड रेल्वे स्थानक महत्त्वपूर्ण जंक्शन असून या स्थानकातून रोज नाशिक मुंबई आदी ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. रेल्वे प्रशासनाने मनमाड करांची हक्काची गाडी मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस बंद करून त्याऐवजी धुळे दादर ही एक्सप्रेस सुरू केली. धुळे येथूनच गाडीत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मनमाड, लासलगाव नाशिक येथील प्रवाश्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.
याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अतिरिक्त डबे या गाडीला जोडून मनमाड येथे हे डबे खोलण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मनमाड स्टेशन प्रबंधकांना देण्यात आले.मनमाड करांची हक्काची गाडी ही बंद होणार आणि धुळ्याहून गाडी सुरू होणार असे संकेत धुळ्याचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी दिल्यानंतर त्या ठिकाणाहून धुळे दादर ही एक्सप्रेस सुरू झाली तर दुसरीकडे या मतदारसंघाच्या खासदार केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या मतदारसंघातच नांदगाव तालुका असल्याने या मतदारसंघातील अनेक गाड्या यापूर्वी बंद झाले आहेत दुसऱ्या जिल्ह्यातील खासदार त्या मतदारसंघातून नव्याने गाड्या सुरू करत असून मनमाडकरां साठी नवीन गाडी सुरू होणे तर दूर राहिले हक्काच्या गाड्या बंद झाल्या आहेत. धुळ्याहून येणारी भरून येत असल्याने मनमाड, व परिसरातील प्रवाशांसाठी तीन अनारक्षित डबे मनमाड मध्येचं खोलण्यात यावे अशी मागणी विभागीय महाव्यवस्थापनकडे करण्यात आली असून या आशयाची निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिले. त्यांच्या समवेत मनुभाऊ परदेशी अरविंद भाऊ काळे, राजाभाऊ करकाळे आदी उपस्थित होते.
सदर निवेदन स्टेशन प्रबंधक नरेश्वर यादव स्वीकारल्यानंतर त्यांनी तातडीने धुळा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत तातडीने हा प्रश्न सोडवण्यासाठी आणखी तीन बोग्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहु असे आश्वासन दिले. स्टेशन मॅनेजरशी भेट घेण्यासाठी नानाभाऊ भालेराव यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केले.

फलक रेखाटन – श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा !
फलक रेखाटन - श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या रंगीत खडू माध्यमातून मोरपंखी शुभेच्छा ! फलक रेखाटन...