loader image

मंगळणे उपोषणार्थीचे मुंडण, आई आणी बाळाची प्रकृती बिघडली

Dec 7, 2023


नांदगांव : मारुती जगधने सध्या नांदगांव तालुका विविध उपोषनांनी चर्चेत येत आहे आदीवासी महिला सरपंच ३ महिण्याच्या लाडल्याला घेऊन नांदगांव पंचायत समिती प्रवेशव्दारावर अमरण उपोषन करत आहे १० दिवस झाले न्याय मिळाला नाही. या उपोषनाची तालुक्यात चर्चा होत आहे.
मगळणे ता.नांदगांव येथील ग्रामसेवकाच्या गैरकारभारावर ठपका ठेवत अमरण उपोषन पुरकारलेल्या आंदोलकानी उपोषनाच्या १० व्या दिवशी मुंडन करुन तालुका पंचायत समिती प्रशासनाच्या बेफिकीर कारभाराचे दहावे घातले व निषेध नोंदवून संताप व्यक्त केला.
मंगळणे गांवच्या ग्रांमसेवकाच्या कारभारावर ठपका ठेवत चौकशी करण्याची मागणी करुन आदीवासी महिला सरपंचासह पाच ग्रांमपंचायत सदस्यांनी अमरण उपोषन पुकारले या उपोषनाला १० दिवस झाले पण स्थानिक तालुका प्रशासन या उपोषनार्थींना अद्याप न्याय देऊशकले नाही .दरम्यान
रामभाऊ पवार,शेखर पगार,सुदर्शन पवार,सागर पवार,सोनु पाटील, अभिषक पाटील, अक्षय
पवार,बाळू पवार,दादा गायकवाड,विलास पवार या १० उपोषणार्थीनी शासनाच्या निषेध म्हणून मुंडन केले .व निषेध करुन दहाव्या दिवशी मुंडन करुन शासनाच्या बेफिकिरी कारभाराचे दहावे घातले .
दरम्यान सरपंच वैशाली रामभाऊ पवार यांची व त्यांच्या ३ महिण्याच्या बाळाची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुगनालायात दाखल करण्यात आले .
काय आहे हा प्रकार १० दिवस झाले मंगळणे ग्रामस्ताना न्यायमिळत नाही.प्रशासन अधिकारी या कामी का लक्ष घालत नाही? त्यांची निर्णय घेण्याची क्षमता नाही का?


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.