loader image
[ays_poll id=7]

विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विळख्यात न गुंतता मैदानी खेळात सहभाग वाढवावा – प्रा.डॉ. दत्ता शिंपी

Dec 13, 2023


मनमाड : सुदृढ शरीर आणि सशक्त मनासाठी मैदानी खेळ आवश्यक असून मुलांनी मोबाईलच्या विळख्यात गुंतून न पडता मैदानी खेळात सहभाग वाढवावा,’ असे प्रतिपादन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे (नेमी नगर चांदवड) प्राचार्य डॉ.प्रा.श्री. दत्ता शिंपी यांनी केले. ते येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आयोजित वार्षिक क्रीडा महोत्सवा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम नातो, पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना, फादर लॉईड प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अर्चना अनिल निकाळे मॅडम, इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे मा.मुख्याध्यापक श्री. रौल्फी मसक्रेनस सर शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री मुकुंद झाल्टे, मनमाड पोलीस स्टेशनचे मा.पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब थोरात,मा. उपनिरीक्षक श्री.विजय आव्हाड, मनमाड धर्म ग्रामाचे प्रमुख धर्मगुरू फा. सहाय्य राज आदी मान्यवर उपस्थित होते. श्री दत्ता शिंपी यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करून आणि क्रीडा ज्योत प्रचलित करून या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. त्यानंतर क्रीडा मार्शल श्री. सुधाकर कातकडे, श्री. दत्तू जाधव, श्री. स्वप्नील बाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी पथकाने संचलनाद्वारे उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली.शाळेचे माननीय मुख्याध्यापक फादर मॅल्कम यांनी आपल्या भाषणातून मान्यवराचे आभार मानून मुलांना क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. श्री. सुधाकर कातकडे, श्री. दत्तू जाधव, श्री. स्वप्नील बाकळे, श्री. नवनाथ घुगे, श्री. अजिंक्य जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी लेझीम व रिबीन कवायती द्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री पारखे मॅडम व श्री हेमंत वाले सरांनी केले तर आभार प्रदर्शन सौ लीना जाधव मॅडम यांनी केली प्रमुख पाहुण्यांचा परिचय श्री स्वप्निल बाकळे सरांनी करून दिला. मान्यवरांचा सत्कार मा. मुख्या. फादर मॅल्कम व पर्यवेक्षिका सिस्टर ज्योत्स्ना यांनी केला. या क्रीडा महोत्सवात धावणे ,लांब उडी,उंच उडी, गोळा, थाळी, भाला फेक, रिले लंगडधाव,दोरीवरील उड्या, आदी स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने क्रीडा महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.