loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा.

Dec 23, 2023

मनमाड :- एच.ए.के. हायस्कूल ॲन्ड ज्यु. कॉलेज मध्ये संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन क्रीडा महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजीयानी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या खेळाडु विद्यार्थ्यांकडुन क्रीडा ज्योत दौड करुन शालेय क्रीडा महोत्सवाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली. यावेळी संस्थेच्या सचिव हज्जन सायराबानो सलीम अहमद गाजीयानी, सदस्य अब्दुल करीम सलीम अहमद गाजीयानी,आदिलभाई गाजियानी, सादीकभाई पठाण उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष हाजी मोहम्मद सलीम अहमद गाजीयानी यांनी उपस्थित सर्व सहभागी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगितले व स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री. शेवाळे भुषण दशरथ, पर्यवेक्षक अन्सारी शाहीद अख्तर शब्बीर अहमद, शेख आरीफ कासम यांनी मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

या क्रीडा महोत्सवामध्ये क्रिकेट,फुटबॉल, कबड्डी, संगित खुर्ची, बॉल रेस, आटा गोली, रिंग रेस, लिंबु चमचा, रिले रेस,थैला रेस, खो-खो, डॉज बॉल,संगीत खुर्ची,बलुन रेस, रस्सा खेच, स्लो सायकल, बॉल पासिंग द पास, तगडी गेम असे विविध खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या व विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांसाठी क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली होती.

संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजीयानी व शाळेचे मुख्याध्यापक भुषण शेवाळे, पर्यवेक्षक शाहीद अख्तर, शेख आरीफ कासम व शिक्षकांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना शालोपयोगी वस्तू व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.संस्थेच्या सदस्या आयशा मो.सलीम गाजीयानी यांनी यशस्वी नियोजन केले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.