loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरात साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण

Dec 25, 2023


मनमाड शहरात रविवारी साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण अपूर्व उत्साहात संपन्न झाले.
मनमाड शहरात लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
आण्णाभाऊ साठे यांचे वंशज श्रीमती सावित्री माई साठे सून व नातू सचिन साठे यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
गेल्या 35 ते 40 वर्षांपासून अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्याची समाज बांधवांची मागणी होती, आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून आज मनमाड शहर येथे अतिशय भव्य दिव्य असे स्मारक उभे राहिले असून या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.
शिवसेना संपर्क कार्यालय मनमाड येथे सकाळी सावित्रीबाई साठे व सचिन साठे यांचे आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजुमताई कांदे यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
पाकीजा कॉर्नर पासून ते शासकीय उद्घाटन कार्यक्रम ठिकाण पर्यंत पायी चालत ढोल ताशांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर स्मारकाचे व पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण आणि ढोलताशांच्या गजरात समाज बांधवांच्या उपस्थितीत पुतळ्याच्या अनावरण झाले.
यानंतर समाज बांधवांच्या आग्रहास्तव आमदार सुहास अण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांनी ठेका धरला व सर्व मातंग समाज बांधव व पदाधिकाऱ्यांसोबत नृत्य करण्याचा आनंद घेतला.
यानंतर पोलीस परेड ग्राउंड मनमाड येथे सकल मातंग समाज मेळावा चे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या संख्येने मातंग समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी आलेल्या पाहुण्यांचे आमदार सुहास अण्णा कांदे व सौ अंजूम ताई कांदे यांनी सत्कार करत स्वागत केले.
या वेळी मातंग समाजाचे नेतृत्व, नगराध्यक्ष दिवंगत दिलीप भाऊ सोळसे यांना मरणोत्तर कृतज्ञता पुरस्कार त्यांच्या परिवारास देण्यात आला.या वेळी उषाताई सोळसे व कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी समाजभूषण पुरस्कार मुरलीधर ससाणे व समाजरत्न पुरस्कार बाळासाहेब थोरात यांना देऊन सन्मानित करण्यात आले.
सकल मातंग समाजाच्या वतीने आमदार सुहास आण्णा कांदे व सौ.अंजुम ताई कांदे यांना समाज गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
फरहान खान यांना गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.
शहर प्रमुख मयूर भाऊ यांचा गौरव पुरस्कार शिवसेना व युवासेना पदाधिकार्यांनी स्वीकारला.
या कार्यक्रमासाठी मेहनत घेणाऱ्या धनंजय अवचारे व यशवंत बागुल यांचा सत्कार करण्यात आला.
सचिन भाऊ साठे यांनी आपले मनोगत मांडतांना
आण्णा भाऊ साठे यांचे साहित्य 29 देशात गाजत आहे पण कुठल्याही लोकप्रतिनिधी ला वाटल नाही की आण्णा भाऊंचा सन्मान मनमाड मध्ये झाला पाहिजे पण आमदार सुहास आण्णा कांदे यांनी तात्काळ दखल घेत अतिशय भव्य दिव्य स्मारक उभे केले.
अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा सन्मान करणारा, सगळ्या जात समाजातल्या लोकांना आपलं मानणारा, आपले म्हणणारा अशा लढवय्या नेत्याच्या सोबत आम्ही सदैव राहू.
आमदार सुहास कांदे म्हणाले
अनेक वर्षापासून ज्याची वाट आपण पाहिली कदाचित आण्णा भाऊ साठे यांचीच ईच्छा होती की हे महान कार्य माझ्या हातून व्हावे.
आपण सर्वांनी मला मतदानाची भिक घातली म्हणून आज मी आमदार आहे याची मला जाणीव आहे आणि आज मी जे काही कार्य करतोय ते फक्त तुम्ही दिलेल्या ऊर्जेमुळे.
माझ्या अंगाच्या कातड्याची चप्पल केली तर मी मतदारसंघातील जनतेचे उपकार नाही फेडू शकत.
आपण मला ताकद दिली म्हणून मी पाणी योजना असो वा विविध विकास करू शकलो.
हे स्मारक बांधून मी माझं कर्तव्य पार पाडले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आहेर, बापू वाघ यांनी केले तर आभार बाळासाहेब शिरसाठ यांनी केले.

याप्रसंगी मा.आमदार राजाभाऊ देशमुख, अल्ताफ बाबा खान, उपजिल्हाप्रमुख सुनिल हांडगे, तालुका प्रमुख साईनाथ गिडगे, राजाभाऊ अहिरे, राजेंद्र पगारे, गंगाभाऊ त्रिभुवन, नितीन पांडे, सचिन संघवी, फिरोज भाई शेख, युवासेना शहर अधिकारी योगेश इमले, आसिफ शेख, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पिंटू शिरसाठ, अमिन पटेल, अमजद पठाण, ललित रसाळ, आजू शेख, दिनेश घुगे, निलेश ताठे, पिंटू वाघ,महिंद्र गरुड, अमोल दांडगव्हाल, सिध्दार्थ छाजेड, अजिंक्य साळी, प्रमोद अहिरे, स्वराज वाघ, सचिन दरगुडे, निलेश व्यवहारे, लाला नागरे, महेद्र वाघ, बाबा शेख, लोकेश साबळे, मन्नू शेख, अनिल जाधव, बाबा पठाण, सनी पगारे, आसिफ पठाण, स्वराज देशमुख, कैलास सोनवणे, संदीप वावरे, महेश कापडणे आदीसह मनमाडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

“विकसित महाराष्ट्र २०४७” साठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वाचा; शासनाचे व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याची प्रक्रिया सुरू

  नांदगाव: मारुती जगधने महाराष्ट्र शासनाने "विकसित भारत २०४७" या राष्ट्रीय उद्दिष्टानुसार...

read more
मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड महाविद्यालयात स्व.लोकनेते व्यंकटराव हिरे यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन व वृक्षारोपण संपन्न

मनमाड = कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड येथे शिक्षण महर्षी, महात्मा गांधी विद्यामंदिर व...

read more
.