loader image
[ays_poll id=7]

भाजपा तर्फे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी

Dec 25, 2023

नांदगाव सोमनाथ घोगांणे

नांदगांव शहरातील शनि चौक येथे भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती सुशासन दिवस म्हणुन साजरी करण्यात आली. स्व. अटलजी यांना अभिवादन करताना भाजपा च्या माजी प्रदेश उपाध्यक्षा ॲड. जयश्रीताई दौंड यांनी स्व. अटलजी यांच्या सोबत दिल्ली येथील संसद भवनात घडलेल्या भेटी बद्दल ची आठवण सांगितली. सदर कार्यक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस संजय सानप, तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, शहर अध्यक्ष राजाभाऊ बनकर, सोमनाथ घोंगाणे, सतीश शिंदे, मनोज शर्मा, बाबाजी शिरसाठ, ॲड. बी.आर चौधरी, संजय पटेल, महीला मोर्चा शहर अध्यक्षा अन्नपूर्णा जोशी, तारा शर्मा, ॲड. उमेश सरोदे, डॉ. बी.के आहेर, कांतीलाल पटेल, अमोल चव्हाण, धम्मवेदी बनकर, नंदु शर्मा, राजेंद्र चौधरी, देविदास शिंदे, काजल जाधव, नंदिनी निळे, स्वाती जाधव, आकांक्षा रोकडे, वंश पटाईत, संजय सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात स्व. वाजपेयीजी यांच्या प्रतिमेचे पूजन हे शहरातील जेष्ठ नागरिकांना तर्फे करण्यात आले आणि स्व. वाजपेयीजी यांच्या अजरामर कविता व जीवनातील काही प्रसंग, लोकसभेतील त्यांचे भाषण त्यांच्याच प्रखर आणि तेजोमय आवाजात ध्वनिक्षेपक द्वारे उपस्थितांना ऐकविण्यात आल्या. वंदे मातरम् , अटलजी अमर रहे च्या घोषणा देण्यात आल्या.
सदर कार्यक्रमात सुशासन दिवस संयोजक ॲड. जयश्रीताई दौंड आणि सहसंयोजक ॲड. बी.आर चौधरी यांनी सर्व उपस्थित पदाधिकारी, महीला आणि कार्यकर्ते यांचे आभार मानले.

अजून बातम्या वाचा..

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड शहराचे आराध्य दैवत व नवसाला पावणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदीरात 1997 पासून सलग 29 व्या वर्षी यंदा 11 दिवस भाद्रपद महागणेशोत्सव

मनमाड - बुधवार दिनांक 27 /08/2025 रोजी भाद्रपद शुध्द श्री गणेश चतुर्थी निमित्त सकाळी ठीक 09-30...

read more
.