Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चौथ्या महिला धोरणास मंत्रिमंडळाचा हिरवा कंदील? – वडिलांच्या आधी लावावे लागणार आई चे नाव

Dec 25, 2023

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या बारातमती दौऱ्यावर असून तेथे त्यांनी शासकीय धोरणांवरही भाष्य करताना राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार आहे. राज्यात चौथे महिला धोरण आणून महिलांचा सन्मान केला जाणार असून वडिलांच्या नावाआधी आता आईचे नाव लावले जाईल, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीतील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले की, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.दरम्यान, आताही अनेकजण आपल्या नावानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही अशी अनेक नावे आहेत. तर, मंत्रीपदाची किंवा आमदारकीची शपथ घेताना, काही नवीन युवा आमदारांनीही आधी आईचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले.त्यामुळे, महिलांचा, आईचा अशाप्रकारे सन्मान केला जात असल्याची बाब उल्लेखनीय आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अजून बातम्या वाचा..

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

आयशा गाजियानी मॅडम यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल एच.ए. के. हायस्कूल ज्यु.कॉलेज तर्फे सत्कार.

  मनमाड :- रोटरी क्लब ऑफ मनमाड तर्फे एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड च्या...

read more
मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]