मनमाड – भाजपा मनमाड मंडल तर्फे भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्ते चे प्रमुख प्रेरणा स्थान माजी पंतप्रधान, संवेदनशील कवी पत्रकार, प्रभावी वक्ते,भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांची 99 वी जयंती ” सुशासन दिन ” म्हणून साजरी करण्यात आली भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार फुलवाणी भाजपा मनमाड मंडल अध्यक्ष संदीप नरवडे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झालेल्या कार्यक्रमा मध्ये भाजपा नासिक जिल्हा महिला मोर्चा च्या जिल्हा उपाध्यक्ष सौ सोनीताई पवार यांचे हस्ते स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले त्यानंतर स्वर्गीय वाजपेयी यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी ह्या सुशासन दिना संदर्भात माहिती देत स्वर्गीय अटलबिहारी यांच्या भाजपा मधील संघर्षमय वाटचालीच्या विविध आठवणी ना उजाळा दिला या सुशासन दिन कार्यक्रमला भाजपा सरचिटणीस आनंद काकडे सरचिटणीस,नितीन परदेशी,भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष अकबर शहा ,गोविंद सानप,भाजपा जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस योगेश चूनियान जिल्हा , भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुमेर मिसर ,भाजपा नासिक जिल्हा दिव्यांग आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सुनीता वानखेडे ,भाजपा युवा मोर्चा जिल्हा चिटणीस भूषण नेरकर, पवन सानप आदी मान्यवर भाजपा पदाधिकाऱ्यांन सह भाजपा कार्यकर्ते व हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष संदीप नरवडे, आनंद काकडे यांनी केले तर सूत्रसंचालन नितीन परदेशी यांनी केले.

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....