loader image

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अंडर 14 जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील मयुर शिंदे व रजा शेख यांची अर्धशतकीय खेळी युवराज शर्माचे 4 बळी

Dec 29, 2023


 

गुरुवार 28 डिसेंबर 23 रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहे.
2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील मयुर शिंदे व रजा शेख यांनी फलंदाजी मध्ये उत्तम असे प्रदर्शन केले. इस्ट झोन विरुध्द खेळताना या सामण्यात मयुरने 103 चेंडूच्या सहाय्याने 61 धावा जमवल्या ज्यात 7 चौकार मयुरने लगावले त्यासोबतच रजाने 71 चेंडुमध्ये 56 धावा जमवल्या व 9 चौकार लगावले. नंदुरबार संघ 106 धावांवर 6 गडी बाद असताना या दोन्ही मनमाडच्या खेळाडुंनी आठव्या विकेटच्या पार्टनरशिपसाठी 121 धावा जमवत आपले वैयक्तिक अर्धशतके बनवण्यात यश प्राप्त केले तसेच गोलंदाजीत मनमाडच्या युवराज शर्माने 04 बळी , खुशाल परळकर 02 बळी व गौरव निते 01 बळी असे प्रदर्शन केले. हे सर्व खेळाडु मनमाडचे असुन भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करतात.

मनमाडमधील या खेळाडुंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर पहिल्या डावाच्या आघाडीवर नंदुरबार संघाला आघाडीचे गुण प्राप्त करण्यात यश आले. या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुंची प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 14 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव यु. पाटील सर यांनी या खेळाडुंना या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.

भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल, चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची नियुक्ती

भाजपा च्या नाशिक उत्तर जिल्हा उपाध्यक्ष पदी नितीन पांडे तर जिल्हा चिटणीस पदी जयकुमार फुलवाणी यांची...

read more
आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

आंतर महाविद्यालयीन वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

मेघा आहेर ने पटकावला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा बहुमान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे संपन्न...

read more
.