loader image

विद्यार्थ्यांची सुरक्षा वेशीवर – दे धक्का स्कूल वाहनाने विद्यार्थ्यांना पोहचवले जात आहे शाळेत…. वाहतूक पोलिस लक्ष देतील काय?

Jan 1, 2024





नांदगाव : हम चले स्कूल पण स्कूल बस धक्कास्टार्ट असल्याने पोखरी घाटात बंद पडलेल्या स्कूल बसला धक्का देतांना चिमुकले, दि १ जावेवारी साकळी १०: ३० वाजता चिंचविहीर ता. नांदगांव येथून क मा का शाळेला जानारी सुमारे ४० विद्यार्थी,मुले, मुली कोंबून एका सात सिटर परवानगी असलेल्या चारचाकी गाडीत घेऊन जाताना ही गाडी पोखरी घाटात बंद पडली म्हणून चालकाने १० ते १५ मुलांना खाली उतरून गाडीला दे धक्का द्यायला लावल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला.शालेय विद्यार्थी घेऊन जानारी गाडी दे धक्का आसेल तर विद्यार्थी कसे वेळेत शाळेवर जातील ११ वा शाळा भरते पण ११ वाजे पर्यंत स्कुलबस बंद अवस्थेत रस्त्यावर उभी होती.खेड्यात शाळा असताना पालक शहरातील नामांकित शाळेत मुलांना का पाठवतात? याचा विचार पालकांनी करण्याची वेळ आली आहे.शाळेत जानारी मुले किती सुरक्षित आहे ? ज्या गाडीत मुले प्रवास करतात ती गाडी कंडीशन मध्ये आहे का गाडीची आर टी ओ ने पासींग केली काय स्कुलबस म्हणून तिला मान्याता आहे का? मुले
वेळेत शाळेत जातात का? या संबधित पाल्यांना कधी विचारपूस केली का?
दरम्यान ही बस एजबार झाली की काय? कारण या स्कुल बसला मागे व पुढील भागाला नंबर दिसून आला नाही? कामावर आलेली अशा डब्बागाडीला आर टी ओ ने स्कुलबस म्हणून परवानगी दिली कशी असे आनेक प्रश्न यावेळी निर्माण झाले. या स्कुलबस मध्ये जळगांव खु,जळगांव,बु,चिंचविरी व वाड्या वस्तूवरील मुले नांदगांव ला माध्यमिक शाळेवर येत असतात ज्या पालकांनी आपल्या पाल्याची सुरक्षा ज्या स्कुल बसवर तथा चालकावर सोपविली त्या वाहनाची अशी आसवस्था असेल तेव्हा मुलांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा अशा बेजबादार वाहन चालकावर किंवा मालकावर शाळा किंवा आर टी ओ,व पालक काय? भुमिका घेणार हे वेळच ठरवेल
चिंचविहीर ते नांदगांव हे अंतर सुमारे १० कि मी असेल एवढे अंतर पार करुन हमे स्कूल चले म्हणनारे मुलांना गाडीला धक्का द्यावा लागतो.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.