loader image

भुमी क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू हसन शेख य नंदुरबार जिल्हा अंडर 14 क्रिकेट सामन्यात चमकला

Jan 6, 2024




गुरुवार ४ जानेवारी रोजी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या अंडर 14 ( जिल्हास्तरीय ) स्पर्धा पुणे येथे खेळवल्या जात आहे. या क्रिकेट स्पर्धेत मनमाडमधील भुमी क्रिकेट अकॅडमीतील खेळाडु नंदुरबार जिल्ह्यातर्फे खेळत आहे.
2 दिवसाच्या या कसोटी सामण्यात मनमाडमधील हसन शेख हा नंदुरबार अंडर 14 संघाचे नेतृत्व करत असुन या स्पर्धेत हसनचा नेतृत्वाखालील नंदुरबार अंडर 14 संघाने आपला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवला व 147 धावांनी अहमदनगर संघाला नंदुरबार संघाने पराभूत करण्यात यश प्राप्त केले आहे.

सामण्यातील दुसर्या इनिंग मध्ये हसनने ताबडतोब फलंदाजी करत 11 चौकार व एक षटकाराच्या सहाय्याने 64 चेंडुत 64 धावा बनवुन स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक पुर्ण केले व आपल्या संघासाठी सर्वोत्तम धावा करत उत्तम असे प्रदर्शन केले. तसेच गोलंदाजीत मनमाडच्या गौरव निते याने सामण्यात ४ बळी मिळवले व खुशाल परळकर याने सामण्यात २ बळी मिळवुन संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी केली.

हे सर्व खेळाडु मनमाडचे असुन भुमी क्रिकेट अकॅडमीमध्ये सराव करतात. याव्यतिरिक्त नंदुरबार संघातील शांतनु आव्हाड याने सामण्यात ८बळी तसेच अर्जुन साळुंखे याने सामण्यात ५ बळी मिळवले. मनमाडमधील या खेळाडुंच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर नंदुरबार अंडर 14 संघाला विजय प्राप्त करण्यात यश मिळाले.

या प्रदर्शनासाठी मनमाडमधील या नवोदित खेळडुंची प्रशंसा केली जात आहे. या स्पर्धेत त्यांनी चांगले प्रदर्शन करुन महाराष्ट्र अंडर 14 संघात निवड व्हावी अशी शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहे.

नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन चे सचिव युवराज पाटील सर यांनी या खेळाडुंचे व संपुर्ण संघाचे या प्रदर्शनासाठी अभिनंदन केले.

भुमी क्रिकेट अकॅडमीचे आधारस्तंभ ईरफान मोमीन , राजाभाऊ पगारे , गणेश धात्रक, श्रेणिक बरडिया , अंकित पगारे , तय्यबभाई शेख, हबीब शेख , शुभम बापु गायकवाड, सिध्दार्थ बरडिया , कौशल शर्मा , भुषण शर्मा , परवेज शेख , सनी फसाटे , सनी पाटिल, मनोज ठोंबरे सर , कलश पाटेकर , रोहित पवार, दक्ष पाटिल, चिराग निफाडकर तसेच संचालक वाल्मीक रोकडे यांनी खेळाडुंचे अभिनंदन करुन पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा दिल्या.

या खेळाडुंना मार्गदर्शन सिध्दार्थ ( भोला ) रोकडे सरांचे लाभले असुन श्री. गुरुगोबिंद सिंग हायस्कूल मनमाडचे प्रशासक श्री. सुखदेव सिंग जी सर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांना पुढिल सामन्यांसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.