loader image

नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे युवकाचा खून. संशयित दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

Jan 9, 2024




नांदगाव सोमनाथ घोंगाणे


नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे काल रविवारी रात्री वेहळगांव रस्त्याच्या
बाजूला दिपक रमेश कदम याची पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे.
याबाबत नांदगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील संशयित आरोपी योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे राहणार साकोरा यांच्यावरती नांदगाव पोलीस ठाण्यात भा. द. वि कलम ३०२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की,तालुक्यातील साकोरा- वेहळगाव रोडवर मुळ डोंगरी फाट्यावर रस्त्याच्या कडेला एक पुरुषाचा मृतदेह असल्याचे ॶॅंब्यूलन्स चालक शांतीनाथ राठोडला दिसल्याने साकोरा येथील काही मित्र तसेच पोलिस पाटील बाबासाहेब बोरसे यांना माहिती दिली.यावर नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचत मृतदेहाची ओळख पटवली सदर मयत व्यक्ती दिपक रमेश कदम(३०) राहणार साकोरा असे समजले. त्यास पैशाच्या देवाण-घेवाणीच्या वादातून योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांनी दगडाने व लोखंडी रॉड ने डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला असून, सदर मयताचा अपघात झाला आहे. असा बनाव करून वेहळगांव रस्त्याच्या कडेला आणून टाकले होते. याबाबत रविवारी सकाळी मयत दिपक,त्याचा भाऊ भाऊसाहेब, संशयीत आरोपी योगेश व देवाजी यांचेत आर्थिक व्यवहार झाले असल्याचे समजते.तसेच मयत दिपकचे एक वर्षापासून गावातील एका विवाहित महिलेबरोबर संबंध ठेवून संसार करीत होता.त्यामुळे सुरूवातीला अनैतिक संबंधातून खून झाल्याचा संशय बळावला होता.मात्र पोलिसांनी लावलेल्या छड्यात आर्थिक व्यवहारातून खून झाल्याचे निष्पन्न झाले. सदर घटनेत वरील दोन संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, अटक करण्यात आले आहे. मयताची पत्नी मनीषा दिपक कदम राहणार साकोरा हिचे फिर्यादीवरून नांदगाव पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ७/२०२४भा. द. वी. कलम ३०२, ३४ प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे.


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.