जागतिक मराठी राजभाषा गौरव दिन व कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त नाशिक जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा सन्मान पुरस्कार देऊन मराठी भाषा विकासासाठी उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती संघाचे अध्यक्ष सुरेश सलादे व उपाध्यक्ष शिवाजी पवार यांनी दिली. नाशिक शहर, मालेगाव शहर व नाशिक जिल्ह्यातील मराठी विषयासाठी विविध उपक्रम राबवीत असलेले प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षक निवडून त्यांना कुसुमाग्रज जयंतीदिनी शिरवाडे वणी येथे शिक्षणमंत्री व मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्याचा प्रयत्न आहे.
यासाठी शासकीय शाळा, जिल्हा परिषद शाळा, खासगी अनुदानित आणि विनानुदानित सर्व माध्यमांच्या शाळांतील शिक्षक, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, डीएड बीएडच्या प्राध्यापकांनी पाठविलेल्या प्रस्तावांतून प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षक निवडले जातील. नाशिक, मालेगाव महानगरपालिका, नगरपालिकांमधून विशेष पुरस्कार दिले जातील. यासाठी नाशिक, मालेगाव शहर व जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतील शिक्षकांनी परिपूर्ण प्रस्ताव ३१ जानेवारी २०२४ पर्यंत KUSUMA GRAJPURSKAR @ GMAIL.COM यावर पीडीएफ स्वरूपात पाठवावे, असे उपाध्यक्ष पवार यांनी आवाहन केले आहे.

राशीभविष्य : १५ ऑक्टोबर २०२५ – बुधवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....