आज मनमाड मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आरोग्याच्या, आयुष्यमान भारत, आवास योजनेची घरे, जलजीवन मिशन, उज्वला गॅस अशा प्रकारच्या केंद्र सरकारच्या योजना ह्या गावागावात पोहचत आहे की नाही हे पडताळून पाहणे व देशाला विकसित भारताकडे नेण्यासाठी प्रयत्न करणे हाच या यात्रेचा उद्देश असून या माध्यमातून गावागावांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्याचे काम करत असून ही संकल्प यात्रा म्हणजे विकासाचा रथ असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी केले.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विकास भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांनी मोदी सरकाचे कौतुक करत मेरी कहानी मेरी ज़ुबानी अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.तसेच यावेळी विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ डॉ भारती पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रांत गाढवे साहेब, तहसीलदार सिद्धार्थ मोरे,CEO शेषराव चौधरी, THO डॉ जगताप, विलास कातकाडे,संदीप अगोणे,नितीन पांडे ,पंकज खताळ, संदीप नरवडे, जयकुमार फुलवाणी, साईनाथ गिडगे, सविता गिडगे,जलील अन्सारी, नितीन अहिरराव, सुनील बोडके, अल्ताफ खान, आझाद पठाण, योगेश इमले, दीपक पगारे, राजाभाऊ भाबड, बाळासाहेब पगारे, नितीन परदेशी, निळूभाऊ संगीता,संगीता बागुल, पूजा छाजेड, शीला धिवर,दिलीप नरवडे,कैलास अहिरे,अझहर शेख सह नागरिक उपस्थित होते.




