loader image
[ays_poll id=7]

एकनाथ महाराज धार्मिक , सांस्कृतिक आणि अध्यात्मिक असे संपन्न व्यक्तिमत्त्व – हभप सदगीर महाराज

Jan 11, 2024


 

मनमाड : (योगेश म्हस्के) येथे आयोजित करण्यात आलेल्या संस्कृती संवर्धन समिती आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे द्वितीय पुष्प राष्ट्रीय किर्तनकार हभप श्री एकनाथ महाराज सदगीर यांनी गुंफले , त्यांनी आपल्या व्याख्यानात ‘संतश्रेष्ठ एकनाथ महाराज’यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला.

संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या चारशे पंचविसाव्या जयंती वर्षानिमित्त सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार श्री एकनाथ महाराज सदगिर यांचे ‘संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या जीवन चरित्र’ या विषयावर व्याख्यान झाले , श्री एकनाथ महाराज सदगिर हे श्रीराम जन्मभूमी अयोध्या तीर्थक्षेत्र न्यासाकडून २२ जानेवारीच्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित महानुभाव देखील आहेत.संतांचे आगमन हे ठरवुन झालेले असते , तसेच त्यांचे वैकुंठ गमणही ठरलेले असते. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांनीही धर्म जनजागृतीसाठी महत्वपूर्ण कार्य केले आहे.त्यांचे जीवनचरित्र जगावेगळे आहे. संघर्ष केल्या शिवाय धर्म टिकत नाही , असे प्रतिपादन यावेळी हभप एकनाथ महाराज सदगीर यांनी केले.

यावेळी प्रगती बँकेचे अध्यक्ष श्री पोपटभाऊ सुराणा तसेच मनमाड मधील अध्यात्मिक क्षेत्रात गेली साठ वर्षे सतत कार्यरत असणाऱ्या दत्तोपासक मंडळाचे सचिव श्री गणेश गरुड हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. आजचे व्याख्यान हे मनमाड मधील गुंतवणूक सल्लागार श्री देवराम सदगिर यांनी प्रायोजित केले होते.

कार्यक्रमाचे स्वागत अभिजित रसाळ , सुत्रांचालन रत्नाकर घोंगडे , आभार अमोल तावडे यांनी मानले , समितीचे अध्यक्ष महेश नावरकर , प्रवीण व्यवहारे , रमाकांत मंत्री , प्रमोद मुळे , सतिश न्हायदे, प्रकाश गाडगीळ आदी सदस्य यावेळी उपस्थित होते.

आज महाराष्ट्रातील प्रसिद्ध वक्ते श्री गणेश शिंदे यांचे ‘बाप माणुस’ या विषयावर व्याखान होणार असुन , आजच्या या व्याख्यानास शहरातील श्रोत्यांनी सायंकाळी 6.00 वाजता , सीता लक्ष्मी हॉल , छत्रे हायस्कूल येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

मनमाड शहर भाजपा तर्फे आरक्षण विरोधी राहुल गांधी व हिंदू विरोधी शरद पवार यांचे विरोधात जोरदार घोषणा बाजी करीत निषेध आंदोलन

राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका मुलाखती दरम्यान काँग्रेस भारतात सत्तेत आल्यास आरक्षण काढून टाकू...

read more
कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

कासलीवाल स्कूलमध्ये माता पालकांसाठी कुकिंग बॅटल (कुकिंग विदाऊट फ्लेम्स ) स्पर्धेचे आयोजन…..

नांदगांव : दि १३ मारुती जगधने दि.13 सप्टेंबर 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम...

read more
लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड व लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने एच.ए. के. हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये कर्करोग (कॅन्सर) जनजागृती कार्यक्रम संपन्न.

  मनमाड :-लायन्स क्लब ऑफ मनमाड प्राइड,लायन्स क्लब ऑफ मनमाड सिटी व कॅन्सर सेंटर अमेरिका (CCA)...

read more
मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
.