loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त ‘घरगुती पर्यावरणपुरक देखावा स्पर्धेचे’ आयोजन

मनमाड शहर मराठी पत्रकार संघाच्यावतीने गणेशोत्सवानिमित्त ‘घरगुती पर्यावरणपुरक देखावा स्पर्धेचे’ आयोजन

मनमाड : मनमाड शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो यानिमित्ताने घरोघरी गणेशाची स्थापना...

read more
नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन कार्यकारणी निवड ;अध्यक्षपदी दिनेश रूणवाल तर उपाध्यक्ष शरद आहेर

नांदगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन कार्यकारणी निवड ;अध्यक्षपदी दिनेश रूणवाल तर उपाध्यक्ष शरद आहेर

नांदगाव : संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक यांच्या उपस्थितीत नांदगांव फोटोग्राफर असोसिएशन ची २०२२/२३ या...

read more
क्रीडा दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान व वेट लिफ्टिंग प्रात्यक्षिक

क्रीडा दिनानिमित्त छत्रे विद्यालयाच्या माजी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान व वेट लिफ्टिंग प्रात्यक्षिक

हॉकी चे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या स्मरणार्थ साजरा होणाऱ्या क्रीडा दिनानिमित्त छत्रे...

read more
नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

नांदगाव : नांदगाव शहरातील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन...

read more
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत परिवर्तनची बाजी

मविप्रची निवडणूक संपन्न ; मविप्रच्या इतिहासातील सर्वोच्च मतदारांनी हक्क बजावला

महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाची शिक्षणसंस्था म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचा...

read more
.