loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा तर्फे ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा तर्फे ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न

मनमाड शहर भाजपा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज नगर श्री दत्त मंदिर येथे भारतीय स्वातंत्र्या चा ७६ वा...

read more
वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार

वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास करता येणार

वयाची 75 वर्षं पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस (ST) मधून मोफत प्रवास...

read more
कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

कवी रविंद्रनाथ टागोर इंग्लिश मिडीयम स्कूल येथे ७५ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ....

read more
सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाडच्या शाखेचा कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाडच्या शाखेचा कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाडच्या शाखेचा कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट 75 वा अमृत महोत्सव...

read more
ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदन संपन्न

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदन संपन्न

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा...

read more
मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम सम्पन्न

मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम सम्पन्न

मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन...

read more
.