loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024

नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर कोअर कमिटी स्थापन; लवकरच पदाधिकाऱ्यांच्या होणार नियुक्त्या : आमदार कांदे

मनमाड शहर कोअर कमिटी स्थापन; लवकरच पदाधिकाऱ्यांच्या होणार नियुक्त्या : आमदार कांदे

मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे तसेच त्यांच्या सोबत असलेले आमदार व इतर सहकारी हीच मूळ शिवसेना असून या मूळ...

read more
(बघा व्हिडीओ) नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव विद्यार्थ्यांनी साकरली तिरंगा कलाकृती

(बघा व्हिडीओ) नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव विद्यार्थ्यांनी साकरली तिरंगा कलाकृती

नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या...

read more
मनमाडचे प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी यांची सूर्योदय अक्षर लेखन पुरस्कारासाठी निवड

मनमाडचे प्रसिद्ध कवी प्रदीप गुजराथी यांची सूर्योदय अक्षर लेखन पुरस्कारासाठी निवड

जळगाव तथा नाशिकमधील साहित्य क्षेत्रातील अग्रेसर सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्यावतीने गोदा साहित्य...

read more
सावधान ! आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ; ३ महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

सावधान ! आता महावितरणची वीजचोरांवर करडी नजर ; ३ महिन्यात १३१ कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

नाशिक : वीजचोरीमुळे नियमित वीजबिल भरणाऱ्या प्रामाणिक वीज ग्राहकांवर वीजदर वाढीचा बोजा पडतो. अशा...

read more
एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा संपन्न

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा संपन्न

मनमाड:-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये...

read more
छत्रे न्यू इंग्लिश स्कुल च्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” निमित्त भव्य प्रभात फेरी चे आयोजन

छत्रे न्यू इंग्लिश स्कुल च्या वतीने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” निमित्त भव्य प्रभात फेरी चे आयोजन

" स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव " निमित्त भव्य प्रभात फेरी चे आयोजन छत्रे न्यू इंग्लिश स्कुल च्या...

read more
.