loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ठरल्याप्रमाणे घ्याव्यात ; राष्ट्रवादी काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात याचिका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत घेण्यात याव्या या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या...

read more
मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने ” हर घर तिरंगा “अभियानाअंतर्गत तिरंगा ध्वज व बिल्ले वाटप

मनमाड बचाव कृती समितीच्या वतीने ” हर घर तिरंगा “अभियानाअंतर्गत तिरंगा ध्वज व बिल्ले वाटप

मनमाड :- शासनाच्या 'हर घर तिरंगा' अभियानाचे निमित्ताने मनमाड बचाव कृती समितीने देश,समाज आणि जनता...

read more
९ वर्षांच्या मुलाने २८,५००फळझाडे लावत.. संपूर्ण भारतात २० मिनी जंगले तयार केली ; आनंद महिंद्रानी कौतुक केले

९ वर्षांच्या मुलाने २८,५००फळझाडे लावत.. संपूर्ण भारतात २० मिनी जंगले तयार केली ; आनंद महिंद्रानी कौतुक केले

चेन्नईच्या या नऊ वर्षांच्या मुलाने 28,500 फळझाडे लावली आहेत.. संपूर्ण भारतात 20 मिनी जंगले तयार...

read more
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” उपक्रमाअंतर्गत मनमाड नगर परिषदे मार्फत झेंडा विक्री केंद्र स्थापन करणेत आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” उपक्रमाअंतर्गत मनमाड नगर परिषदे मार्फत झेंडा विक्री केंद्र स्थापन करणेत आले आहे.

मनमाड शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत "हर घर झेंडा"...

read more

मनमाड नगरपरिषद मार्फत तिरंगा ध्वज विक्री केंद्र 1. नगरपरिषद कार्यालय 2. जुने होमगार्ड कार्यालय, जयश्री टाॅकीज शेजारील शाॅपींग सेंटर 3. वाचनालय समोरील वक्रांगी सेंटर IUDP शाॅपींग सेंटर . मुख्याधिकारीमनमाड नगरपरिषद मनमाड

मनमाड नगरपरिषद मार्फत तिरंगा ध्वज विक्री केंद्र 1. नगरपरिषद कार्यालय 2. जुने होमगार्ड कार्यालय,...

read more
.