loader image
[ays_poll id=7]

गट शिक्षण अधिकाऱ्याची उप शिक्षकाला धमकी – नांदगावातील घटना

Jan 11, 2024


नांदगाव : मारुती जगधने परधडी येथील शिक्षक पती पत्नीचे वेतन का काढले नाही या संदर्भात फोनवर विचारणा करणारया उप शिकक्षाला गट शिक्षण अधिकाऱ्याने धमकावले असता त्यांच्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला.
दरम्यान दोन दिवसापूर्वी जि प शिक्षण अधिकारी यांनी परधाडी जि प शाळा व बाभुळवाडी जि प शाळेला अचानक भेट देऊन शाळे संदर्भातील माहिती घेतली .

नांदगाव तालुक्यात प्राथमिक शिक्षण विभागात भरती प्रक्रिया लांबल्याने तालुक्यात सुमारे २२५ शिक्षक कमी आहे या मुळे विद्यार्थी ज्ञानार्जना पासून वंचित होत आहे काही शाळांना पालकांनी कुलप लावल्याची घटना घडली त्यातच काही दिवसापुर्वी परधाडी शाळेवर शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यातील फ्रिस्टाईल हाणामारी घडली होती. आॅगस्ट २०२३ मध्ये घडली घटनेत चौकशीत उप शिक्षकाला निलंबित केले आता त्याच निलंबित केलेल्या शिक्षकाचा व त्याच्या पत्नीचे वेतन निघाले नाही म्हणून फिर्यादी नरेंद्र ढोले यांनी गटशिक्षण अधिकारी प्रमोद चिंचोले यांना भ्रमणध्वनी करुन आमचे वेतन का काढले नाही याची विचारणा केली याचा राग अनावर झालेल्या गट शिक्षण अधिकारी चिंचोले यांनी ढोले यांना अर्वाच्च भाषा वापरून मारण्याची धमकी दिली या संदर्भात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल असून तपास पो उ नि वाघमारे करीत आहे या घटने संदर्भात गटशिक्षणाधिकारी चिंचोले यांनी दिलेली
प्रतिक्रिया :
माझ्यावर खोटे आरोप करुन शिक्षणाधिकारी यांच्या कडे चुकीची तक्रार केल्यामुळे अनावधानाने बोलले गेले.
त्यामागे कोणताही अनुचित हेतू नव्हता. तसेच त्यांच्या संदर्भात यापूर्वी देखील शाळेच्या मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
त्याचा राग मनात ठेवून त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या कडे माझ्याबद्दल चुकीची व खोटी तक्रार केली आहे.
तरीही त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो.प्रमोद शंकर चिंचोले गटशिक्षण
अधिकारी पंचायत समिती नांदगाव


अजून बातम्या वाचा..

मध्य रेल्वेच्या एकदिवसीय तपासणी मोहिमेत भुसावळ विभागातून प्रवाशांकडून ४० लाख दंड वसूल

मध्य रेल्वेच्या एकदिवसीय तपासणी मोहिमेत भुसावळ विभागातून प्रवाशांकडून ४० लाख दंड वसूल

मनमाड रेल्वे स्थानकातून फुकट्या प्रवाशांकडून एक लाख ८१ हजार २६० रुपये वसूल करण्यात आले विना तिकीट...

read more
गेल्या दोन दिवसांपासून मनमाड शहरातील काही भाग अंधारात….वीज कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे कामास विलंब

गेल्या दोन दिवसांपासून मनमाड शहरातील काही भाग अंधारात….वीज कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे कामास विलंब

मनमाड : (योगेश म्हस्के) पावसाळा ऋतू सुरू झाला की दरवर्षी शहरातील नागरिकांना विजेच्या समस्येला तोंड...

read more
अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द

अंकाई किल्ला – मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंग चे काम प्रगतीपथावर : अनेक रेल्वे गाड्या रद्द

भुसावळ रेल्वे विभागात अंकाई किल्ला-मनमाड स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम रेल्वे विभागाकडून...

read more
तळवाडे येथील वीज पडून मुत्यू झालेले शेतकरी कै.शांताराम निकम यांच्या वारसाना आ.सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने चार लाख रुपये मदत

तळवाडे येथील वीज पडून मुत्यू झालेले शेतकरी कै.शांताराम निकम यांच्या वारसाना आ.सुहास कांदे यांच्या पाठपुराव्याने चार लाख रुपये मदत

याबाबत अधीक वृत असे की जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या वादळ वाऱ्यासह पावसामध्ये मोठे...

read more
(बघा व्हिडिओ) मनमाड ला मुसळधार पाऊस ; छत्रे विद्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ

(बघा व्हिडिओ) मनमाड ला मुसळधार पाऊस ; छत्रे विद्यालयात पावसाचे पाणी शिरल्याने तारांबळ

मृग नक्षत्र कोरडे गेल्याने बळीराजा हवालदिल झाला होता मात्र आर्द्र नक्षत्र लागताच वरून राजाने कृपा...

read more
.