loader image
[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा

Jan 12, 2024


मनमाड ता.१२. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष निकम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय युवा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले.
आजच्या काळामध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचे विचार तरुणांनी आत्मसात करण्याची गरज आज निर्माण झाली आहे. प्रत्येक तरुणाने या दोन विभूतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाच्या विकासात भर टाकली पाहिजे.
भारताला सशक्त व समृद्ध बनवायचे असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्येक युवकाने आत्मसात केले पाहिजे आजची तरुण पिढी सोशल मीडिया व व्यसनाधीनतेकडे गुरफटत चालली आहे. आपल्याला स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला भारत साकार करायचा असेल तर स्वामी विवेकानंदांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे असे डॉ. निकम यांनी प्रतिपादन केले.
वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. युवराज भामरे यांनी स्वामी विवेकानंद तर कनिष्ठ महाविद्यालयाच्या श्रीमती सुरेखा निकम यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवनकार्याचा परिचय करुन दिला.
याप्रसंगी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. बी. एस. देसले, प्रा. पी. के. बच्छाव, विठ्ठल फंड, कुलसचिव श्री समाधान केदारे, महाविद्यालयातील प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. पी. व्ही. अहिरे यांनी केले.


अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याला रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड परीक्षेत यश, प्राचार्यांनी केला सत्कार.

मनमाड – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला, विज्ञान व वाणिज्य स्वायत्त महाविद्यालय, मनमाड येथील...

read more
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड - शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.