loader image

के आर टी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंदांची जयंती साजरी करण्यात आली.

Jan 12, 2024


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी. मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या मुलींनी केले होते. “मुजरा मानाचा माझा राजमाता जिजाऊंना घडविले त्यांनी छत्रपती शिवाजींना”ना वाकायचे,ना झुकायचे ‘ अन्यायावर पलटून वार करायचे ” सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती. राजमाता यांच्या भूमिकेत सायुरी केदारे.’अंगणातील तुळस. गोठ्यातील गाय अन घरातील माय यांच्यावर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची गय केली जाणार नाही.असे स्त्रियांवर अन्याय,अत्याचार, करणाऱ्यांना ठणकावून सांगितले अशा आदर्श राजमाता जिजाऊ यांचे कार्य आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी धन्य राजमाता जिजाऊ महाराष्ट्राची स्वराज्य जननी सदैव होईल नतमस्तक हे आदराने तुमच्या चरणी.असे उदगार सायुरी केदारे हिने तिच्या भाषणातून केले. इयत्ता सातवीचे अक्षता शिनकर. महेक चोरडिया.श्रेया यादव. काजल नायक. या विद्यार्थ्यानी आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता दुसरीचा अनय कोठावदे याने स्वामी विवेकानंदांची भूमिका साकारली. त्याने आपल्या भाषणामध्ये स्वामी विवेकानंद यांची राष्ट्रनिष्ठा अध्यात्म व देशातील युवकांना शिक्षणासाठी कसे प्रयत्न करावे हे आपणास विवेकानंद यांच्या चरित्रातून शिकायला मिळते. राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत मेहेक चोरडिया. काजल नायक. सायुरी केदारे. तर स्वामी विवेकानंद यांच्या भूमिकेत अनय कोठावदे वैभव पाटील. राजमाता जिजाऊ यांची जयंती व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती तसेच राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. या विद्यार्थ्यांना सौ,अनिता शाकाद्विपी.सौ ऋचा शिंपी यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन समीक्षा आव्हाडने केले.


अजून बातम्या वाचा..

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव पुरस्कार 2025 मा. ज्येष्ठ साम्यवादी नेते भाई जयंत पाटील यांना जाहिर

. शेतकरी,राजकीय, सहकार चळवळीतील , योगदानाबद्दल स्वातंत्र्य सैनिक कॉ. माधवराव गायकवाड जीवनगौरव...

read more
.