नाशिक,येवला,दि.१३ जानेवारी :- राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून नोव्हेंबर २०२३ मध्ये येवला तालुक्यात झालेल्या गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या ३७७ शेतकऱ्यांना ७८ लाख ७७ हजार रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
येवला तालुक्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती. तसेच अधिक मदत मिळवून देण्याबाबत शेतकऱ्यांना आश्र्वासित केले होते. त्यानुसार जिरायत, बागायत व फळपिकांच्या प्रती हेक्टरी येवला तालुक्यातील आंबेगाव, सोमठाण देश, निळखेडे व कातरणी येथील ३७७ नुकसानग्रस्त ७८ लक्ष ७७ हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागा आयोजित स्पर्धेत सेंट झेवियर हायस्कूल प्रथम
मनमाड:- महाराष्ट्र शासनाच्या, शालेय शिक्षण विभाग जिल्हा परिषद नाशिक तर्फे आयोजित 'मुख्यमंत्री माझी...