loader image
[ays_poll id=7]

जुन्या व एजबार गाड्या असताना नांदगांव आगाराचा इंधन बचतीचा संकल्प !

Jan 16, 2024



नांदगाव : मारुती जगधने नांदगांव बस आगाराला नेहमीच प्रशासनाकडुन दुजाभावाची वागनुक मिळते म्हणजे नांदगांव डेपोला जुन्या,एजबार झालेल्या,गाड्या दिल्या जातात या गाड्या नेहमी रस्त्यावर बंद पडतात तरी देखील येथील चालक वाहक हार न मानता नांदगांव आगाराचा व्यवसाय जिल्हाग्रामिण मध्ये प्रथम क्रांमकाने असतो हि किमया नांदगांव डेपोची आहे या नांदगांव आगारात १६ जानेवारी पासून पुढील एक महिना इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ झाला आहे .
येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय इंधन बचत कार्यक्रम नांदगाव येथे दि.१६ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ या मासिक काळात इंधन बचत मोहिंम कार्यक्रमाचे उदघाटन नांदगाव बस आगारात पार पडले. यावेळी मालेगावचे आर.टी.ओ. भरत भवाळ यांच्या हस्ते इंधन बचत मासिक कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगाराचे व्यवस्थापक हेमंत पगार होते . तर प्रमुख अतिथी प्रा. सुरेश नारायणे होते. आर.टी.ओ.भरत भवाळ म्हणाले की, इंधन बचत करणे काळाची गरज आहे. त्यासाठी महामंडळाच्या बस ड्रायव्हर यांनी काही तांत्रिक बाबी लक्षात घेऊन इंधन बचत कशी करता येईल या दृष्टीने प्रयत्न करावे.
गॅस टँकचं झाकण घट्ट लावलेलं नसेल, तरीही तुमची गाडी अपेक्षित मायलेज देणार नाही. गॅस टँकचं झाकण घट्ट लावलं नसेल, तर गाडीतला गॅस लीक होऊ शकतो. याचसाठी गॅस टँकचं झाकण घट्ट लावल्याची खात्री करून घ्या.
गाडी कुठल्याही कारणानं जागीच उभी असेल, तर ती बंद ठेवा. चालू ठेवू नका. त्यामुळेही इंधनाची बचत होईल.
कारच्या अॅक्सलरेटर पॅडेलवर सातत्यानं पण हळूहळू दाब द्या. गाडीची गती सावकाश वाढवा. विशिष्ट वेगमर्यादेतच गाडी चालवा. त्यामुळे इंधन बचत होईल.तसेच त्यांनी बस कर्मचारी वर्गाशी हितगुज केले.तर हल्ली पेट्रोल, डिझेल, आणि गॅसचा साठा मर्यादित होत चालला आहे. पारंपरिक इंधन संपत्तीचा साठा कमी होत असल्याने सामान्य जनतेने वाहानांचा वापर आवश्यक तेव्हाच करावा. व जनतेने इंधन बचतीत स्वयंस्फूर्तीने सहभागी होऊन इंधन बचतीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच आठ दिवसांतून एक दिवस वाहनांचा वापर बंद केल्यास इंधन बचतीसाठी नक्कीच हातभार लागेल असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी मनोगतातून व्यक्त केले. तर अध्यक्षीय मनोगतातून आगार व्यवस्थापक हेमंत पगार यांनी इंधन बचतीसाठी नांदगाव एस.टी.डेपोचे सर्वच कर्मचारी सातत्याने प्रयत्न करत असतात. मागील काही महिन्यात नांदगाव आगराने इंधन बचत करून नांदगाव आगार नाशिक विभागातुन नफ्यात अव्वलस्थानी असल्याचे सांगितले
.त्याबद्दल नांदगाव आगारातील कर्मचारी चालक वाहक वर्गाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी आगार व्यवस्थापक ए.डब्लु.एस. सानप, अरुण इप्पर, डी.पी.जगधने, डी.एम.भाबड,वाहन परीक्षक राजु कटारे, मयुर सुर्यवंशी, विनोद इप्पर तसेच डेपोतील मॅकिनिक कर्मचारी, बस वाहक,चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

आकांक्षा व्यवहारे साईराज परदेशी आनंदी सांगळे प्रवीण व्यवहारे तृप्ती पाराशर यांची खेलो इंडिया यूथ गेम्स साठी निवड

राजगिर बिहार येथे ११ ते १५ मे २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ७ व्या खेलो इंडिया यूथ गेम्स...

read more
नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

नांदगाव, मारुती जगधने ६ मे 2025 तालुक्यातील उपलब्ध जलसाठे,त्यातील क्षमता, व शेती सिंचनाच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांसोबत आमदार सुहास कांदे यांची आढावा बैठक संपन्न.

  तालुक्यात दोनशेच्या वर पाझर तलाव बंधारे लहान मोठे धरणे असून त्यातील गाळ काढून आहे त्या...

read more
कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाची इयत्ता १२वी बोर्ड परीक्षेत उज्वल यशाची परंपरा कायम

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता...

read more
जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

जिल्हास्तरीय क्रिकेट सामण्यात भुमी क्रिकेट अकॅडमीतील खुशाल परळकर चे दमदार अर्धशतक तर युवराज शर्माचे चार बळी

  रविवार 04 मे 25 रोजी BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन क्रिकेट आसोसिएशन...

read more
.