loader image
[ays_poll id=7]

मविप्र मनमाड च्या हिवाळी शिबिराचा कातरणी येथे समारोप

Jan 17, 2024


मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय मनमाड व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर 10 जानेवारी 2024 पासून मौजे कातरणी तालुका येवला जि. नाशिक या ठिकाणी सुरू होता त्याचा समारोप आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजी उत्साहात संपन्न झाला. या शिबिरामध्ये सात दिवसाच्या कालावधीत विद्यार्थ्यांनी गाव व परिसराची स्वच्छता, स्मशानभूमीची दुरुस्ती व स्वच्छता, रस्ता दुरुस्ती, बांधबंधिस्ती, बंधाऱ्यातील गाळ उपसा, तसेच युवा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्घाटन सोहळ्यासाठी नाशिक येथे उपस्थिती, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण कुटुंबांचे सर्वेक्षण इत्यादी कामे केली. समारोपप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी डी गव्हाणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ए.बी.जाधव यांनी शिबीर काळातील कामाचा अहवाल मान्यवर व ग्रामस्थ यांच्या समोर वाचून दाखवला. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त केले. कामाच्या संस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये एक परिवर्तन झाल्याचे जाणीव विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून बोलून दाखवली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समाजसेवक पत्रकार श्री भागवत झाल्टे यांनी सामाजिक जीवनात काम करत असताना बरे वाईट अनुभव आपल्याला येतात व तीच आपल्या पुढील वाटचालीसाठीची शिदोरी ठरतात असे प्रतिपादन झाल्टे यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दिनकर साहेबराव पाटील यांनी मराठा विद्या प्रसारक समाज तसेच नांदगांव तालुका संचालक अमीतभाऊ बोरसे, सभासद हे कायम महाविद्यालयाच्या व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याचे सूतोवाच केले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गोविंद उगले, अंबादास सोनावणे, प्रल्हाद शिंदे, विजय कुऱ्हाडे उपस्थित होते. या सर्वांनी विद्यार्थ्यांचे व त्यांनी केलेल्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. संपूर्ण शिबिर कालावधीत कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. बी. जाधव, प्रा. विकास शिंदे, श्रीमती अहिरे मॅडम, श्रीमती जाधव मॅडम, वाहक संतोष शेळके, सेवक सुनील उगले यांनी अथक परिश्रम घेतले. समारोप प्रसंगी सी ए प्रशांत कदम, प्रा गणेश बर्वे, प्रा नितीन गवळी, प्रा. भरुक मॅडम, प्रा. कर्डेल मॅडम, प्रा. सुर्यवंशी मॅडम, कार्यालयीन व्यवस्थापक योगेश तिले आदी उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी

मनमाड :-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी...

read more
कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे क्रांतीसुर्य म.ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

म. गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे महाविद्यालयाचे...

read more
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
.