loader image
[ays_poll id=7]

नांदगाव येथे देवाज टॅक्सी युनियन शाखेचे आमदार कांदे यांच्या हस्ते उद्घाटन

Jan 17, 2024

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते नांदगाव येथील देवाज टॅक्सी युनियन शाखा उद्घाटन करण्यात आले.
देवाज टॅक्सी युनियन स्टॉप कार्यालय, हुतात्मा सर्कल नांदगाव येथे आज आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष राजेश (बबीकाका) कवडे होते तर मंचावर मनमाड चे नगरसेवक गालीबभाई शेख, देवीदास मोरे, अमोल नावंदर, नंदु भाऊ पाटील, शहर अध्यक्ष सुनिल जाधव, नगरसेवक अभिषेक सोनवणे, सागर हिरे,शशी सोनवणे उपस्थित होते.
टॅक्सी युनियन तर्फे सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आले.
आमदार कांदे यांनी सर्व टॅक्सीचालकांना नियमात राहुन योग्यवेळी गाड्यांचे मेन्टेनन्स करुन सर्व आवश्यक कागदपत्रांची पुर्तता ठेवून प्रवाश्यांना चांगली सेवा देण्याचे मार्गदर्शन केले. आपल्या सुखदुखाच्या काळात मी आणि बबीकाका नेहमी आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन दिले.
टॅक्सीचालक ज्यांची रोजी रोटीचा मोठा गंभीर प्रश्न होता, रोज कमवणार तर रोज खाणार अशी त्यांची आर्थिक परिस्थीती आहे.टॅक्सीचालकांच्या अनेक समस्या होत्या आण्णानी त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना एक युनियन स्थापन करुन दिली त्यांना आपल्या स्वखर्चातून एक कॅबीन, बैठक व्यवस्था, पाण्याची सोय अश्या सुविधायुक्त नविन टॅक्सी कॅबीन देत त्यांची मोठी अडचण सोडवून दिली त्याबददल सर्व टॅक्सीचालकांनी आमदार कांदे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत आभार मानले.
सुत्रसंचलन सुनिल जाधव यांनी केले.
या प्रसंगी टॅक्सी युनियनचे आजम खान, जाकीर शेख, इरफान शेख, अयाज शेख, मुदस्सीर पठाण, शाहरुख शेख, विजय बागुल, आरिफ शेख, अल्तमश शेख, मुज्जुभाई रंगरेज, सर्वच पदाधिकारी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

भारतीय जनता पार्टी येवला शहर मंडल यांच्यावतीने संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियान

२०२४ कार्यशाळेचे आयोजन येवला शहरात दहा हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट स्थानिक स्वराज्य संस्था विजया...

read more
मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड डॉक्टर्स असोसिएशन तर्फे सत्कार : नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध – आमदार कांदे

मनमाड - मनमाड डॉक्टर असोसिएशनच्या सदस्यांनी नवनिर्वाचीत आमदार सुहास आण्णा कांदे व अंजुमताई कांदे...

read more
भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

भाजपा मनमाड शहर व भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळे चे आयोजन

मनमाड शहरात भाजपा चे पाच हजार सदस्य नोंदणी चे उद्दिष्ट ❗विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या...

read more
मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड शहर भाजपा मंडलाच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या 100 व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन

संपूर्ण देशातील भाजपा कार्यकर्त्यांन चे प्रेरणा स्थान भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न स्वर्गीय...

read more
.