loader image

बंजारा समाज बांधवांतर्फे आमदार कांदे यांचा सपत्नीक सत्कार

Jan 20, 2024


नांदगाव : मारुती जगधने नांदगाव विधानसभा मतदार संघाचे
आमदार सुहास कांदे यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी तालुक्यात दोन शासकीय वसतिगृह मंजूर करून आणल्याच्या पार्श्वभूमीवर बंजारा समाज बांधवांच्या वतीने आ.सुहास कांदे व त्यांच्या सुविद्य पत्नी समाजसेविका सौ.अंजुम कांदे यांचा नांदगाव निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

तालुक्यातून ऊसतोडीसाठी जाणाऱ्यात ठाकर,भिल्ल,वंजारी,बंजारा समाज बांधवांचा समावेश असतो.ही लोक ऊसतोडीसाठी गेल्यानंतर त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडतो.परिणामी ते अशिक्षित राहून जातात.या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आ.कांदे यांनी शासनाकडून संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत दोन वसतिगृह मंजूर करून आणली आहेत.
यावेळी जिल्हा बँकेचे अधिकारी एन. के.राठोड,कृ उ बा.चे माजी संचालक रामचंद्र चव्हाण,पिंपरखेड चे ग्रा.प.सदस्य रमेश दळवी,जामदरी चे ग्रापं. सदस्य सखाराम चव्हाण,लोहशिंगवे ग्रापं.चे सदस्य गणेश चव्हाण,जातेगांव ग्रापं.चे माजी उपसरपंच भाऊसाहेब चव्हाण,भरत चव्हाण लोढरा,दीपक नायक पळाशी,डॉ. प्रकाश चव्हाण,हेमराज चव्हाण ढेकू,पिटूभाऊ राठोड चांदोरा,पुष्पराज राठोड चांदोरा,ज्ञानेश्वर चव्हाण पिंपरखेड आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.