loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांना महानुभाव पंथाच्या वतीने”कर्तव्य परायण समाजविभूषण पुरस्कार” जाहीर

Jan 21, 2024



वितरण सोहळा होणार २३ जानेवारी रोजी
पुरस्कार वितरण सोहळा हिसवळ खुर्द येथील दत्त मंदिर आश्रमात सुरू असलेल्या श्रीमद्भभागवत कथा समारोप समारंभ या भव्य कार्यक्रमात दिनांक 23 जानेवारी सकाळी दहा वाजता आचार्य कारंजेकर बाबाजी (अमरावती), आचार्य राजधर बाबाजी (कोपरगाव), आचार्य श्री मामाजी (बांबोरी), भागवताचार्य महामंत्री श्री आचार्य चिर्डे बाबाजी (नाशिक), परमपूज्य श्री दत्तराज व्यास पालीमकर (मुकुंदराज) बाबाजी, श्रीकृष्ण राज बाबा पंजाबी नाशिक, श्री भागिनाथ राज बाबा बिडकर नाशिक, श्री प्रेम मुनि बाबा महानुभाव, श्री अमोल दादा कोल्हेकर अहमदनगर, श्री विजयराज बाबा पंजाबी आदि च्या उपस्थितीत होणार आहे तरी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाशिक जिल्हा महानुभाव समिती अंतर्गत हिसवळ खुर्द आश्रम व सर्व उपदेशी सदभक्त मंडळ, व समस्त ग्रामस्थ यांनी केले आहे या वेळी या गावात आमदारांच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची विकास कामांचे लोकार्पण तसेच दोन कोटी वीस लाख रुपये निधी चे मंजूर विविध कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे पुरस्कार देताना मानपत्रात त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला आहे
मा. सुहास आण्णा कांदे यांचा जन्म निफाड तालुक्यातील तामसवाडी या गोदावरीच्या तीरावर वसलेल्या गावी एका सर्वसामान्य कुटुंबात झाला लहानपणापासूनच कुस्ती या खेळाची आवड असल्याने त्यांनी नाशिक येथील खैरे वस्ताद यांच्या तालमीत सराव सुरू केला. व याच शहरात मानाचा नाशिक महापौर केसरी किताब मिळवला. पुढे आपले शालेय शिक्षणा सोबतच व्यवसाय उडी घेतली. तेथेही स्वतःला झोकून देत त्यांनी चांगली प्रगती केली. व्यवसाय करत असताना समाजसेवा ही सुरू करत नाशिक शहरात स्वतःची रक्तपेढी सुरू केली अनेक ठिकाणी रुग्णवाहिका मोफत दिल्या. हे करत असताना अनेक राजकीय पक्षांची नजर त्यांच्यावर पडली व त्यांना आपल्या पक्षात सामील करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. सन २०१४ साली त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली त्यात त्यांना अपयश आले. पण म्हणतात ना अपयश ही यशाची पहिली पायरी असते असे समजून त्यांनी पुढे येथे आपले काम सुरूच ठेवले व पुढील 2019 च्या निवडणुकीत या ठिकाणाहून विजयी होत विधानसभेत पोहोचले. अतिशय दुर्लक्षित व विकासापासून वंचित राहिलेल्या या मतदारसंघात त्यांचे पुढे अनेक आव्हाने उभी होती. परंतु अतिशय अभ्यासू वृत्तीने व अंगात असलेल्या खेळाडू वृत्तीने सर्व आव्हाने सहज पेलण्याचे काम त्यांनी केले. नांदगाव शहर,व मनमाड शहर या दोन्ही शहरांचा भीषण असा पाणी प्रश्न सोडवतांना ग्रामीण भागातील 120 गावांमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना मार्गी लावल्या.बेरोजगार युवकां साठी मनमाड जवळ औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सोडवला. दोन्ही शहरात महापुरुषांचे सर्व पुतळे नवीन उभारण्याचं काम केलं. नांदगाव शहरात शिवसृष्टीचं मोठं काम त्यांनी या ठिकाणी सुरू केले आहे .सर्व धार्मिक स्थळांचा विकास करत गावा गावात व वाडी वस्तीवर रस्ते मजबूती करण करत सभामंडप ही उभारले. मोफत रुग्णवाहिका, मोफत फिरते दवाखाने. आरोग्य शिबिर, शासकीय दाखले व रेशन कार्ड घरपोच मोफत दिले. सेवालाल महाराजांची मूर्ती असो की एकलव्याची मूर्ती त्या त्या समाजाच्या वस्तीवर दिली. अपंगांना मोफत सायकल तर इतर काही ठिकाणी वैकुंठा रथ,पाण्यासाठी टॅंकर दिली व अनेक गरजूंना व आपत्तीग्रस्तांना स्वखर्चातून वैयक्तिक मदतही केली आहे. आजवर कधीही झाला नाही असा मतदारसंघात पंधराशे कोटी रुपये आणून भरीव असा विकास केला. हे करताना अनेक धार्मिक सोहळ्यांना सहकार्य करत त्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभागी होऊन धर्मरक्षणाचे काम ही त्यांनी केले. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रत्यक्षपणे महिलांचे मेळावे घेत मार्गदर्शन केले व याठिकाणी हे अनमोल काम सुरू केले आहे. अशा या विकास पुरुषाला त्यांच्या केलेल्या आजवरच्या सर्व कार्याची प्रशंसा करत नाशिक जिल्हा मानुभाव समितीच्या मार्गदर्शनाखाली दत्त मंदिर महानुभाव आश्रम हिसवळ खुर्द यांचे कडून यंदाचा मानुभाव पंथाचा जिल्हास्तरीय”कर्तव्य पारायण समाजविभूषण पुरस्कार” देऊन त्यांना संत महंतांचे उपस्थितीत सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे.
सन्मान आपल्या सामाजिक योगदानाचा..!
सन्मान आपल्या सामाजिक कर्तुत्वाचा..!
🙏 *दंडवत प्रणाम* 🙏
नाशिक जिल्हा महानुभाव समिती अंतर्गत
*श्री.दत्तमंदिर महानुभाव आश्रम हिसवळ खुर्द ता.नांदगाव


अजून बातम्या वाचा..

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त बालदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला

मनमाड -येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या...

read more
कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस 14 नोव्हेंबर बालदिन निमित्त पूर्वसंध्येला मनमाड धर्मग्रामाला भेट दिली

आज दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी नाशिक कॅथॉलिक धर्मप्रांताचे बिशप Barthol bareto यांनी स्वतंत्र...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाअंतर्गत इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनात सर्वोत्तम कामगिरी करीत राज्यस्तरावर निवड झालेली आहे. 

दिनांक :12/11/2025   कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल व ज्यु. कॉलेज, मनमाडची केंद्र सरकारच्या...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये आदिवासी क्रांतिकारक बिसरा मुंडा यांची जयंती संपन्न झाली....

read more
नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

नामनिर्देशनपत्रातील माहितीसोबत संकेतस्थळावर कागदपत्र अपलोड करण्याची आवश्यकता नाही शनिवारी (ता. १५) देखील नामनिर्देशनपत्र स्वीकारणार

  मुंबई, दि. १३ - नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांकरिता संकेतस्थळावर फक्त...

read more
.