loader image

बघा व्हिडिओ-ओम मित्र संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती तर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा धार्मिक परंपरा नुसार श्रीराम रक्षा पठण, भजन महाआरती करून साजरा

Jan 22, 2024


मनमाड – ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड तर्फे विश्वातील समस्त हिंदू धर्माला गर्व आणि अभिमान वाटेल असा ऐतिहासिक क्षण सोमवार दिनांक 22 जानेवारी 2024 (पौष शु. द्वादशी )रोजी धार्मिक परंपरे नुसार श्रीराम मंदिर आठवडे बाजार मनमाड येथे साजरा करण्यात आला 496 वर्षा नंतर मुक्त झालेल्या अयोध्या येथील पवित्र श्रीराम जन्मभूमी वर हिंदू चे आराध्य दैवत प्रभू श्रीराम चंद्र यांचे भव्य मंदिर निर्माण झाले असून मंदिर गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता माता व श्री हनुमान यांचे मूर्ती ची प्राण प्रतिष्ठा संपन्न झाली या प्रतिष्ठापनेच्या अत्यंत शुद्ध व पवित्र मुहूर्तावर दिना 22 रोजी धार्मिक कार्यक्रम करून हा ऐतिहासिक हिंदू गौरव दिन दीपावली स्वरूपात करण्यात आला गेल्या 38 वर्षा पूर्वी 1986 साली ओम मित्र मंडळ संचालित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड ची स्थापना याच मंदिरात झाली श्रीराम जन्मभूमी मुक्ती ची चळवळ ही याच मंदिरात सुरु झाली सकाळी श्रीराम मंदिरात मान्यवरा च्या हस्ते महाअभिषेक कार्यक्रम संपन्न झाला तर सकाळी 11 वाजता वेदिका महिला मंडळ तर्फे भजन वसामूहिक श्रीराम नाम जप आणि सामूहिक श्रीराम रक्षा पठण करण्यात आले श्रीराम जन्मभूमी मुक्ती साठी सन 1990, आणि 1992 झालेल्या कारसेवा आंदोलनात सक्रिय सहभागी झालेल्या नितीन पांडे, नाना शिंदे, प्रज्ञेश खांदाट, आमिष परिक, नीलकंठ त्रिभुवन, रमाकांत मंत्री आदी कारसेवकां च्या हस्ते दुपारी ठी 12-29 मी नि महाआरती करण्यात आली या नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रमा चे नियोजन शेखर पांगुळ, किशोर गुजराथी, गोपाळ कौराणी संदीप शिनकर, आदी प्रमुख कार्यकर्ते नी केले तर कार्यक्रमाला प्रकाश कुलकर्णी संतोष बळीद, क्रांती आव्हाड, नारायण पवार,विकास काकडे आनंद काकडे, योगेश शिंदे,तिलोक संकलेचा, दिनेश केकाण रोहित कुलकर्णी, शिवाजी सानप,पियुष गंगेले डॉ मिलिंद धारवाडकर, डॉ भरत जगताप,नितीन परदेशी, दिपक पगारे,नरेश गुजराथी हर्षद गद्रे,सतीश शेकदार, दिपक शर्मा डनिश परिक,सुनील नाईक, सूर्यभान वडक्ते राजेश पाटील सौ नीलिमा धारवाडकर, सौ वैष्णवी पुरंदरे, भरत छाबडा, सचिन व्यवहारे,बैरागी आदी प्रमुख कार्यकर्ते श्रीराम भक्त मोठया संख्येने उपस्थित होते विशेषतः महिला ची संख्या लक्षणीय होती कार्यक्रम चे संयोजन ओम मित्र मंडळ संचलित श्रीराम जन्मोत्सव समिती मनमाड ने केले.


अजून बातम्या वाचा..

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड चेअरमनपदी रामकृष्ण नागरे व व्हाइस चेअरमनपदी चेतन सुतार सर यांची निवड.

  मनमाड:- मनमाड माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित,मनमाड च्या चेअरमनपदी श्री.रामकृष्ण...

read more
छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
.