loader image
[ays_poll id=7]

महानुभाव पंथाकडून जिल्हास्तरीय पुरस्कार आमदार कांदे यांना प्रदान

Jan 23, 2024

तालुक्यातील विकासकामांसह धार्मिक,अध्यात्मिक क्षेत्रात ही भरीव योगदान देत असलेल्या आमदार सुहास कांदे यांना महानुभव पंथाकडून कर्तव्यपरायण,समाजभूषण हा जिल्हास्तरीय पुरस्कार महानुभव पंथाच्या प्रमुख महंताच्या हस्ते हिसवळ खुर्द येथे भव्य कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. सन्मान चिन्ह,व मानपत्र देऊन करण्यात आला
श्री.दत्त मंदिराचा ४५ वा वर्धापन दिन व श्रीमद्भगवतगीता कथा ज्ञानयज्ञ तथा सन्यास दिक्षा विधी सप्ताह सुरु आहे.त्या कार्यक्रमाचे सभामंडप पूजन व ध्वजारोहन आ.कांदे यांचे हस्ते संपन्न झाले. नाशिक जिल्हा महानुभाव समिती अंतर्गत महानुभव पंथाकडून राजकीय व्यक्तीला प्रथमच हा पुरस्कार देण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर अमरावतीचे महंत आचार्य कारंजेकर बाबाजी, अध्यक्ष स्थानी होते. संवत्सर चे राजधर बाबाजी,नाशिक चे आचार्य भागवताचार्य चिरडेबाबा , आचार्य लांडगे बाबाजी, आचार्य श्री घुगे बाबाजी, दत्तराज व्यास पालीमकर, मुकुंदराज बाबाजी, विजय बाबा पंजाबी, कृष्णराज बाबा पंजाबी, दादेराज बाबा बिडकर, अमोल दादा कोल्हेकर, नगरपालिकेचे नगरसेवक दिनकर पाटील,माजी सभापती विलासराव आहेर,माजी नगराध्यक्ष राजेश कवडे,शाईनाथ गिडगे,राजेंद्र पवार,दत्तात्रय निकम,किशोर लहाने, राजेंद्र देशमुख, अंकुश कातकडे, अमोल नावंदर,सागर हिरे उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर आ.कांदे यांनी सदर दत्त मंदिराला यापूर्वीच दोन सभामंडप दिले असल्याचे नमूद करून येत्या ८ ते १५ दिवसात भक्त निवास चे काम सुरु करणार असल्याचे यावेळी जाहीर केले.तर प्रस्ताविक करताना उपसरपंच संजय आहेर यांनी गावात आज एक कोटी रुपयांच्या कामांचे आज लोकार्पण करण्यात आले. तर दोन कोटी 29 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.तर सुमारे सात कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहे. तर होत असलेले कामे आमदार साहेबांच्या माध्यमातून होत आहेत.तर काही पूर्ण झाली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला राज्यभरातून सुमारे 350 संत मंहत तपस्विनी उपस्थित होते. तर सदभक्त व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक येथील उत्सव समिती चे सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश

मनमाड महाविद्यालयाच्या रासेयो स्वयंसेवकांची जिल्हास्तरीय विविध स्पर्धे मध्ये यश महात्मा गांधी...

read more
भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे एक पेड माँ के नाम या उपक्रमा अंतर्गत फुलवाणी नगर मध्ये 105 वृक्षा चे रोपण

भारतीय जनता पक्ष राजकारण करीत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजपयोगी उपक्रम राबवित असते याच...

read more
जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

जिल्हास्तरीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत छत्रे विद्यालयाच्या कृष्णा शिंदे निवेदिता देवडे यांची चमकदार कामगिरी

विभागीय क्रीडा संकुल नाशिक येथे संपन्न झालेल्या १९ वर्ष आतील मुले मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील भाविका कौरानी , सुहानी बोरा , लविशा दौलानी , शर्विना आहिरे , स्वरांजली पवार , गुरज्योत कौर मंगत व आर्या साळुंखे यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला संघात निवड

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने )...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

भुमी क्रिकेट अकॅडमीतील सुयश पवार , हसनेन शेख , खुशाल परळकर , गौरव निते व सौरभ चव्हाण यांची नाशिक जिल्हा क्रिकेट आसोसिएशन 14 वर्षातील संघाच्या संभाव्य खेळाडु यादित निवड.

  महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी ( जिल्हास्तरीय सामने ) नाशिक...

read more
.