loader image
[ays_poll id=7]

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचे संस्कारपीठ- प्रा.सुरेश नारायणे

Jan 24, 2024

मांडवड (प्रतिनिधी) शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने २४ सप्टेंबर १९६९ ला त्या काळचे शिक्षणमंत्री डॉ.व्ही.के.आर.व्ही. राव यांनी म.गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना उपक्रम सुरू केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांना श्रमाचे आणि कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरु झालेला उपक्रम आज भारतभर ३२लाख. स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. म्हणून राष्ट्रीय सेवा योजना हे एक विद्यार्थ्यांचे संस्कारपीठ बनले आहे. असे प्रतिपादन प्रा. सुरेश नारायणे यांनी केले. ते मांडवड येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिररात “राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व ” या विषयावर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.पी.मोरे होते. पाहुण्याचा परिचय व प्रास्ताविक सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.श्रीमती के.टी.बागुल यांनी केले. सुरवातीला स्वयंसेविका नम्रता फोडसे हिने राज्यस्तरावरील एन.एस.एस.चे शिबिरातील आलेले अनुभव व आत्मविकास कसा झाला याचे कथन केले. या शिबिरात शंभर स्वयंसेवकांचा सहभाग आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव,युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास आणि लोकसंख्या नियंत्रण जागृती व श्रमदानद्वारे शोषखड्डे,वृक्षांना आळे करणे, व समाजप्रबोधन या शिबीरकाळात केले जाणार आहे असे प्रतिपादन यावेळी कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.पी. मोरे यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म.वि.प्र. संस्थेचे सरचिटणीस ॳॅड.नितीन ठाकरे, नांदगाव तालुका संचालक अमित बोरसे पाटील,प्राचार्य डॉ. एस.एन.शिंदे, उपप्राचार्य प्रा.डाॅ.संजय मराठे,सहायक कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.पी.गायकवाड, प्रा.श्रीमती पी.एच.जाधव,प्रा.श्रीमती के.टी.बागुल,स्व.श.आ.ज.वि.मांडवडच्या मुख्याध्यापक श्रीमती संजीवनी कांबळे, सरपंच अ़कुश हरी डोळे, उपसरपंच सौ.जीजाबाई विठ्ठल आहेर ग्रामसेवक मयुर आहेर व स्वयंसेवक, विलास आहेर, नितीन सरोदे,शिबीर यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

अजून बातम्या वाचा..

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थ्यांनींना सुरक्षितेसाठी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न.

  मनमाड:-एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये किशोरवयीन विदयार्थीनींच्या स्वयं...

read more
टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

टेबल टेनिस स्पर्धेत नांदगावच्या कासलीवाल स्कूलच्या तीन संघांची विभागीय स्तरावर निवड……

नांदगाव, दि.23 ऑगस्ट 2024 नांदगाव येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडियम स्कूलच्या तीन संघांची टेबल...

read more
आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

आंतरराष्ट्रीय खेळाडू मुकुंद संतोष आहेर ची जय भवानी व्यायामशाळेच्या वेटलिफ्टिंग खेळाडूना एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांच साहित्य भेट

सलग तीन आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धांमध्ये पदक विजेता तसेच राष्ट्रीय वरीष्ठ गटातील विक्रम...

read more
श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

श्रावण मास संकष्ट चतुर्थी निमित्त गुरुवार दिनांक 22/08/2024 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

दोन सुवर्ण पाच रौप्यपदकासह राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड च्या खेळाडूंची चमकदार कामगिरी पूजा परदेशी आनंदी सांगळे ला सुवर्णपदक

बारामती येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२४ दरम्यान संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय...

read more
कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

कवी रबिंद्रनाथ टागोर हायस्कूल अँड ज्यु. काॅलेज, मनमाड येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला

बातमी : दिनांक: १५/०८/२०२४ . शाळेच्या परंपरेनुसार इयत्ता 10 वी मध्ये शाळेत प्रथम येणा-या...

read more
.