loader image

नांदगाव डेपोच्या नादुस्त बसवर दुचाकी आदळली दोघे ठार

Jan 25, 2024

नांदगाव. : मारुती जगधने नांदगांव आगाराची बस रस्त्यावर केव्हा कुठे बंद पडेल याचा नेम नाही.नांदगाव आगाराच्या काही बस तर एजबार झालेल्या आहेत तरी देखील त्या रोडवर धावता धावता बंद पडतात अन प्रवाशांच्या कामाचा खोळंबा होतो पण काय करणार आता ७५ गाठलेले व हाफ तिकीट वाल्यांची गर्दी बस ला असतेच आशातच
नांदगाव आगाराची बस ४० गांव जाताना रस्त्यातच बंद पडल्याने उभ्या आसलेल्या बसवर दुचाकीस्वार आदळल्याने दोघे ठार झाल्याची घटना दि २४ रोजी घडली.

नांदगांव ४० गाव रोडवर पोखरी शिवारातील सानप बाजार समिती जवळ
नादुस्त बस उभी असताना राञीच्या वेळी दुचाकीस्वार त्यावर धडकल्याने दोघांना प्राण गमवावे लागले .
जातेगाव येथील प्रगतशील शेतकरी सुंदरलाल पुंजाबा पाटील चव्हाण (वय ६०वर्ष) रा जातेगांव आणि त्यांच्यासोबत असलेल्या दौलत शंकू ठाकरे रा. ढेकू खु।। यांचा दि. २४ रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास नांदगाव होऊन जातेगाव कडे मोटार सायकलने येत असताना सानप ऍग्रो या खाजगी कृषी उत्पन्न बाजार समिती पासून हाकेच्या अंतरावर मन्याड नदीपुला जवळ नादुरुस्त होऊन उभ्या असलेल्या बसला पाठीमागून यांच्या मोटरसायकलची धडक बसल्याने अपघात झाल्याने दोघांचे ही निधन झाले. कै.सुंदरलाल पाटील

त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुन, नातवंडे असा परिवार असून मनमिळाऊ स्वभाव असलेल्या पाटिल यांच्या निधनाचे वार्ता जातेगाव येथे समजताच शोककाळा पसरली होती. त्यांच्यावर त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आप्तेष्ट नातेवाईक सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास “प्रेरणाभूमी” म्हणून घोषित

मनमाड, प्रतिनिधी, ता. २८ – मनमाड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी आश्रम वस्तीगृहास...

read more
सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

सातत्य पूर्ण रक्तदान शिबिराचे संयोजक म्हणून नितीन पांडे यांचा जनकल्याण रक्तकेंद्र नाशिक तर्फे सन्मान 

जनकल्याण रक्तकेंद्राच्या ३६ वा वर्धापन दिनानिमित्त शंकराचार्य संकुल गंगापूर रोड येथे शिबीर...

read more
के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अतिशय सुंदर अशी श्री गणेशाची मानवी प्रतिमा साकारली

दिनांक 26/8/2025 रोजी के आर टी हायस्कूल मध्ये इयत्ता तिसरी ते चौथीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी एकत्र...

read more
भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

भाटगाव विद्यालयातील अनोखा उपक्रम. पिंपळ पानावर श्रीगणेशाचे विविध रुपे चित्र रेखाटून विघ्नहर्त्याचे स्वागत…!

आज दि.२६ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण मंडळ भगूर संचालित नूतन माध्यमिक विद्यालय...

read more
.