loader image

खेलो इंडियामध्ये (मनमाड)नाशिकचे वर्चस्व… मनमाडच्या मेघाला सुवर्ण तर कृष्णाला कांस्य

Jan 26, 2024




चेन्नई : येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेत नाशिक जिल्ह्यातील मनमाडच्या मेघा आहेरने आपल्या बहिणभावाचा वारसा कायम राखत सोनेरी कामगिरी केली. मेघाच्या आहेर कुटुंबातील हे तिसरे खेलो इंडिया स्पर्धेतील पदक असून यापूर्वी वीणा व मुकुंद यांनी खेलो इंडियाचे पदक पटकावले होते. एकाच घरात तीन खेलो इंडिया स्पर्धेचे पदक असणारे ते महाराष्ट्रातील ते पहिले कुटुंब बनले आहे.

शेतकऱ्याची पोर लई हुशार हे म्हणणे आज येथे खरे ठरले. मनमाड जवळील मांडवड येथील शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या मेघा आहेर हिने वेटलिफ्टिंग मधील ४५ किलो वजन गटात सुवर्णपदक जिंकून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले. हे स्वप्न साकार करताना तिने क्लीन व जर्कमध्ये स्पर्धा विक्रमाचीही नोंद केली. विशेष म्हणजे ती पहिल्यांदाच या स्पर्धेत सहभागी झाली आहे. मुलांच्या गटात कृष्णा व्यवहारे याने कांस्यपदक पटकाविले

मेघा हिने या स्पर्धेतील स्नॅच या प्रकारात तिसऱ्या प्रयत्नात ६३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्क या प्रकारात ८५ किलो वजन असे एकूण १४८ किलो वजन उचलले. क्लीन व जर्क या प्रकारात तिने दुसऱ्या प्रयत्नाच्या वेळी महाराष्ट्राच्याच सौम्या दळवी हिने गत वेळी नोंदविलेला ८३ किलो या विक्रमाची बरोबरी केली. पाठोपाठ आंध्र प्रदेशच्या आर. भवानी हिने ८४ किलो वजन उचलून नवा उच्चांक नोंदविला. तथापि मेघाने शेवटच्या प्रयत्नात ८५ किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला.

मेघाचे वडील संतोष व आई इंदुबाई हे दोघेही शेतकरी असून आज येथे आपल्या लेकीचे स्वप्न साकार करताना साक्षीदार होते. मेघा हिने पदक स्वीकारल्यानंतर त्या दोघांना घट्ट मिठी मारली तेव्हा त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू बाहेर पडले. मेघा हिची मोठी बहीण वीणा व भाऊ मुकुंद हे दोघेही आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर आहेत. या सर्व भावंडांच्या खुराकाची तसेच अभ्यासाची जबाबदारी त्यांची आई स्वतः सांभाळत असते. भावंडाकडून प्रेरणा घेत मेघाने वेटलिफ्टिंग मध्ये करिअर सुरू केले आहे.

मेघा ही मनमाड येथील छत्रे महाविद्यालयात इयत्ता अकरावी शास्त्र शाखेत शिकत आहे. ती जय भवानी व्यायाम शाळा येथे ज्येष्ठ प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. मेघा व तिची भावंडे मनमाड येथेच राहून सराव करतात.

मेघा हिच्याच गटात आकांक्षा व्यवहारे ही देखील सहभागी झाली होती मात्र तिला पदकापासून वंचित राहावे लागले. एक आठवड्यापूर्वी ती अरुणाचल मध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते. तेथे तिला कांस्यपदक मिळाले होते. तेथून येताना तिची खूपच दमछाक झाली होती त्यामुळे तिला येथील खेलो इंडिया स्पर्धेत पदक मिळवता आले नाही.‌

मुलांच्या वेटलिफ्टिंगमध्ये कृष्णा व्यवहारे याला कांस्यपदक

मुलांच्या गटात मात्र मनमाड चा खेळाडू कृष्णा व्यवहारे याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याने स्नॅच या प्रकारात ८३ किलो वजन उचलले तर क्लीन व जर्कमध्ये त्याने १०१ किलो असे एकूण १८४ किलो वजन उचलले. तो मनमाड येथील गुड शेफर्ड हायस्कूलमध्ये शिकत असून त्याचे या स्पर्धेतील पहिलेच पदक आहे. तो जय भवानी व्यायाम शाळा येथे त्याचे काका प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
—- छत्रे विद्यालयाचे आधारस्तंभ पी जी धारवडकर अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर संचालक नाना कुलकर्णी प्रसाद पंचवाघ मुख्याध्यापक आर एन थोरात उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे पर्यवेक्षिका संगीता पोतदार जय भवानी व्यायाम शाळेचे मोहन अण्णा गायकवाड डॉ विजय पाटील डॉ सुनील बागरेचा प्राचार्य डॉ दत्ता शिंपी गुड शेफर्ड्स स्कूलचे प्राचार्य क्लेमेंट नायडू क्रीडाप्रशिक्षक मनोज देशपांडे लकी रिसम महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे सचिव संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील आर्या साळुंखे , स्वरांजली पवार व सुहानी बोरा यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट आसोसिएशन महिला अंडर 15 संघात निवड

मनमाड - BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

सेंट झेवियर हायस्कूल मनमाड येथे शिकणाऱ्या वेदांत रवींद्र सोनवणेची नाशिक जिल्हा बास्केटबॉल संघात निवड

मनमाड- महाराष्ट्र बास्केटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल असोसिएशन...

read more
.