loader image

टूरिस्ट बसला आग; प्रवासी बाल-बाल वाचले- नांदगाव मालेगाव रोडवर पहाटे अग्नी तांडवचा थरार

Jan 27, 2024




नांदगाव : मारुती जगधने नांदगाव मार्गावर चालणार्या वाहनांचा लहान मोठ्या अपघातांचा शिलशिला चालूच आहे. गत चार दिवसापासून होणारे अपघात थांबता थांबेना त्यातच नांदगाव मालेगाव रोडवर रामवाडी वस्ती नजीक मध्यप्रदेश मधील टूरिस्ट बस चा टायर फुटल्याने आग लागून बस जळून खाक झाली यात प्रवासी बाल बाल वाचले पण प्रवाशांचे सर्व साहित्य जळून खाक झाले नंतर प्रवाशाना दुसर्या वाहनाची व्यवस्था केली गेली ही घटना दि २६ जानेवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास झाली.
इंदोर हुन औरंगाबाद जानारी एम पी १३ पि ८९९९ टूरिस्ट बस ने मालेगाव नांदगांव रोडवरील रामवाडी येथे अचानक पेट घेतल्याने बस जळून खाक झाली यात प्राणहाणी झालेली नाही माञ बसचे लाखॊचे नुकसान झाले. यात प्रवाशांचे वापराचे सर्व साहित्य जळाले.

इंदोर हुन मालेगाव नांदगाव मार्गे औरंगाबाद धावनारी लगझरी बस चा मागील टायर अचानक फुटल्याने बस ने पेट घेतला यावेळी चालकाच्या सावधानतेने बस उभीकरुन प्रवासी उतरून घेतले.यावेळी प्रवासी साखर झोपेत होते. तरी देखील प्रवाशाना खाली उतरविण्यात चालकाला यश आले
हि घटना दि २६ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ( दि २७ च्या सकाळी घडली) दरम्यान दुसर्या बसने सदर प्रवासी प्रवासाला पाठविणयात आले .
टायर फुटला आग लागली या आग्नीकांडात बसचे पूर्णपणे नुकसान झाले असून फक्त सापळा शिल्लक राहिला आहे .बसला बघण्यास नागरिकांनी सकाळी गर्दी केली होती .
दरम्यान नांदगांव ४० गांव, येवला,मालेगांव या रोडवर या पूर्वी तिन अपघात झाले बस जळाल्याची चौथी घटना आहे.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.