loader image

देशाच्या आर्थिक प्रगतीत सहकार क्षेत्रातील बँकांची भूमिका महत्त्वाची:-डॉ. भारती पवार

Jan 28, 2024




महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक शिखर परिषद 2023 – 24 अँकर नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन द्वारा आयोजित दोन दिवसीय महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक परिषद 23 24 चे उद्घाटन केंद्रीय सहकार राज्यमंत्री श्री बी. एल. वर्मा केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ.भारती पवार राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या परिषदेच्या स्वागताध्यक्ष केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार बोलताना म्हणाल्या की या दोन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रातील बँकांना येणाऱ्या अडचणी व सूचना यावर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. बँकिंग क्षेत्रात डिजिटलायझेशन मुळे खूप मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. सहकारातून समृद्धी यातूनच नागरी सहकारी बँकांना आर्थिक पाठबळ देऊन सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाची मदत होत आहे. आतापर्यंत साधारण 28 कोटी जनधन योजनेची बँक खाती उघडण्यात आली आहेत. याचा खूप लाभ होत आहे. तसेच नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सहकार्य करावे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना शासनामार्फत मिळणारा विविध मदतनिधी हा थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला जाणारा निधी हा त्यांच्या इतर कोणत्याही खात्यात वळता करू नये, अशी विनंतीपूर्वक मागणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी यावेळी केली.
याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे,सहकार परिषदेचे आयोजक व अध्यक्ष विश्वास ठाकूर, खासदार विकास महात्मे, महाराष्ट्र नागरी सहकारी बॅंक्स फेडरेशन अध्यक्ष अजय ब्रम्हेचा, एनसीयुआय अध्यक्ष दिलीप संघाणी, नैफक्लब अध्यक्षा ज्योतींद्र मेहता, दीपक चंदे,मिलिंद काळे, शशीताई हिरे,वसंत खैरनार, अशोक झवर, यांच्यासह बँकांचे चेअरमन, संचालक, अधिकारी, कर्मचारी आणि सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
.